Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 17:58 IST2025-10-12T17:56:28+5:302025-10-12T17:58:52+5:30
Viral News: नुकत्याच सुरू झालेल्या पाटणा मेट्रोतील धक्कादायक व्हिडिओ समोर आला.

Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
देशभरात अनेक ठिकाणी प्रवाशांकडून तिकीट न काढता प्रवास करण्याचे प्रकार सर्रास चालतात. मात्र, नुकत्याच सुरू झालेल्या पाटणा मेट्रोतील धक्कादायक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये काही लोक तिकीट स्कॅन न करता मेट्रो स्टेशनच्या प्रवेशद्वारावरील बॅरियरमधून मुलांना आणि स्वतःलाही जबरदस्तीने आत ढकलत असल्याचे दिसत आहे. या 'जुगाडा'चा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
@ghantaa या इन्स्टाग्राम हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. व्हिडिओमध्ये असं दिसतंय की, मुलांचा एक मोठा गट तिकीट स्कॅन न करता, झोपून बॅरियरच्या खालून मेट्रो स्टेशनमध्ये प्रवेश करतात. त्यानंतर मोठे माणसही बॅरियरमधील अरुंद अंतरातून वाकून आत जातात. शेवटी, एक महिला त्या अंतरातून जाण्याचा प्रयत्न करताना अडकते. तेव्हा आधी बॅरियरमधून आत गेलेला एक पुरुष तिला आत ढकलतो. व्हिडिओमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती दिसत असल्याने, या प्रकाराला अधिक वाव मिळाल्याचे दिसत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर अनेक वापरकर्त्यांनी या कृत्यावर तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे. एका वापरकर्त्याने निराशा व्यक्त करत लिहिले, "माफ करा, पण तुम्हाला हेच अपेक्षित होते." दुसऱ्या एका व्यक्तीने ऐतिहासिक संदर्भ देत लिहिले, "मला विश्वास बसत नाहीये की नालंदा विद्यापीठ इथे बांधले गेले आहे." तिसऱ्या व्यक्तीने लिहिले की, "काही दिवसांत, ट्रेन देखील चोरीला जाईल." तर, अनेकांनी हा प्रकार देशाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याचे म्हटले.