DU Professors Dance on Pathaan, Video: 'झुमे जो पठाण' गाण्यावर थिरकल्या दिल्ली युनिव्हर्सिटीच्या महिला प्राध्यापिका; विद्यार्थीही झाले अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 04:02 PM2023-02-21T16:02:59+5:302023-02-21T16:03:51+5:30

डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Pathaan title song of Shahrukh Khan Delhi university lady professors and girls dance goes viral on jhoome jo Pathaan watch video | DU Professors Dance on Pathaan, Video: 'झुमे जो पठाण' गाण्यावर थिरकल्या दिल्ली युनिव्हर्सिटीच्या महिला प्राध्यापिका; विद्यार्थीही झाले अवाक्

DU Professors Dance on Pathaan, Video: 'झुमे जो पठाण' गाण्यावर थिरकल्या दिल्ली युनिव्हर्सिटीच्या महिला प्राध्यापिका; विद्यार्थीही झाले अवाक्

googlenewsNext

Delhi University Professors Dance on Pathaan: पठाण या बॉलिवूड चित्रपटाची क्रेझ आजही जगभरात आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा हा चित्रपट रिलीज झाल्यापासून प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटातील गाण्यांवर लोक डान्स करताना दिसत आहेत आणि ते डान्स व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. नुकताच दिल्ली युनिव्हर्सिटीच्या काही कॉलेज प्रोफेसर्सनी चित्रपटातील सुपरहिट गाणं 'झूम जो पठाण'वर विद्यार्थ्यांसोबत डान्स केल्याचा व्हिडीओ चर्चेत आहे.

सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ कॉमर्स विभागाच्या इन्स्टाग्राम हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, JMC च्या प्राध्यापकांसोबत डान्स करण्याची ही मजेदार झलक आहे. कॉलेजच्या एका मोकळ्या कॅम्पसमध्ये काही विद्यार्थिनी पठाण चित्रपटाच्या गाण्यावर नाचताना दिसत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. मग काही वेळातच कॉलेजमधील काही महिला प्रोफेसरही डान्स फ्लोअरवर येतात आणि आपल्या डान्सची अदाकारी दाखवायला सुरुवात करतात.

लोकांना आवडला व्हिडिओ...

या सर्व महिला प्राध्यापक साडी नेसून नाचताना खरंच खूप अप्रतिम दिसत आहेत. आपल्या प्राध्यापकांना नाचताना पाहून विद्यार्थिनींचे मनोबलही नक्कीच वाढले. त्यामुळे विद्यार्थिंनींनीही त्यांच्यासोबत नृत्य केले. या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांना तो व्हिडीओ भरपूर आवडला आहे. दिल्ली विद्यापीठातील अनेक विद्यार्थी हा व्हिडीओ शेअर करत आहेत आणि उत्साहाने त्यांवर प्रतिक्रियाही देत आहेत.

Web Title: Pathaan title song of Shahrukh Khan Delhi university lady professors and girls dance goes viral on jhoome jo Pathaan watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.