नाद खुळा! ना घोडा, ना कार... थेट गाढवावरून नवरा-नवरी आले लग्नमंडपात; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 13:03 IST2023-03-19T13:01:04+5:302023-03-19T13:03:01+5:30
गाढव असलेल्या गाडीवर बसून नववधू-नवरदेव लग्नाच्या ठिकाणी एंट्री घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

नाद खुळा! ना घोडा, ना कार... थेट गाढवावरून नवरा-नवरी आले लग्नमंडपात; Video व्हायरल
वधू-वरांच्या विचित्र शैली आणि अनोख्या कृतींमुळे अनेक लग्नाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वधू-वर गाढव असलेल्या गाडीवर बसून लग्नासाठी दाखल झाल्याचं दिसत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाकिस्तानमधला असल्याचं सांगण्यात येत आहे. एन्ट्रीची चर्चा रंगली आहे. अनेक पाकिस्तानी युजर्सनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
गाढव असलेल्या गाडीवर बसून नववधू-नवरदेव लग्नाच्या ठिकाणी एंट्री घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. गाढवालाही हार घातलेला पाहायला मिळत आहे. आजूबाजूचे लोक वधू-वरांचे व्हिडीओ बनवण्यात मग्न आहेत. लग्नाला उपस्थित असलेल्या व्हिडिओग्राफरनेही ही संपूर्ण घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. अनेकांनी लोकप्रियता मिळवण्याचा हा स्वस्त मार्ग असल्याचे सांगितले.
अलीकडच्या काळात पाकिस्तानातील महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. 'डेली पाकिस्तान'च्या वृत्तात म्हटले आहे की, पेट्रोलची किंमत 22 रुपये प्रति लीटरवरून 272 रुपये प्रति लीटर झाली आहे. पाकिस्तानमध्ये काही महिन्यांपूर्वी एका नवरदेवाने आपल्या होणाऱ्या पत्नीला लग्नात गाढव गिफ्ट म्हणून दिलं होतं. तो व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"