Pak comedian video on how to speak like shashi tharoor gets epic reply asks to make on imran khan see viral video | Video : पाकिस्तानी तरूणानं सांगितला फाडफाड इंग्लिश बोलण्याचा फंडा; व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल.....

Video : पाकिस्तानी तरूणानं सांगितला फाडफाड इंग्लिश बोलण्याचा फंडा; व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल.....

शशी थरूर (shashi tharoor) यांच्या बोलण्याची पद्धत दाखवणारा पाकिस्तानी स्टँड अप कॉमेडियनचा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोक त्याचा आनंद लुटत आहेत. हा व्हिडिओ ट्विटरवर अकबर चौधरी या पाकिस्तानी विनोदी कलाकाराने शेअर केला होता आणि त्यामध्ये ते तिरुअनंतपुरमच्या खासदारांप्रमाणे बोलण्याच्या पद्धतींबद्दल त्यांनी भाष्य केले आहे. या व्हिडिओवर शशी थरूर यांनीही प्रतिक्रिया दिली असून ती प्रतिक्रिया पाकिस्तानी युझरर्सनी  वाचली आहे.

अकबर यांनी व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'शशी थरूर यांच्यासारखे इंग्रजी कसे बोलायचे.' या व्हिडीओत त्यांनी तीन टप्पे सांगितले, जेणेकरून त्यांच्यासारखे लोक अस्खलित इंग्रजी बोलू शकतील. ही क्लिप पाहून तुम्हीही लोट पोट होऊन नक्कीच  हसाल.

व्हिडीओच्या सुरूवातीला अकबरने ऑक्सफोर्ड डिक्शनरीची एक प्रत ज्युसरमध्ये टाकली मग मिक्सरला लावली आणि नंतर ती प्यायली. मग ते पलंगावर बसले.  तुम्ही पाहू शकता लॅपटॉपला एक ड्रिप जोडला गेला आहे, ज्यात शशी थरूर यांचा व्हिडिओ प्ले होत आहे. त्याच वेळी, दुसरा ड्रिप इन्सुलिन बाटलीला आहे, ज्याचे   ऑक्सफोर्ड डिक्शनरी म्हणून वर्णन केले आहे. तिसऱ्या चरणात त्यांनी डिक्शनरीला कुटले आणि त्याची पावडर बनवून खाल्ली आहे.  बापरे! नदीवर म्हशी धूवून परतताना; अचानक मागून आली मगर, काही कळायच्या आतचं घडलं असं....

ही प्रकिया पूर्ण केल्यानंतर दृश्य बदलते आणि अकबर शशी थरूर यांच्याप्रमाणे बोलू लागतात. गंमत म्हणजे शशी थरूर इंग्रजी बोलताना तेव्हा लोक हैराण होतात असं त्यांना सांगायचं आहे. त्यांनी आतापर्यंत असे अनेक शब्द वापरले आहेत.  जे लोकांना कधी ऐकलेले नाहीत. जसे की - Farrago आणि Floccinaucinihilipilification. आतापर्यंत ३ लाखांपेक्षा जास्तेळा हा व्हिडीओ पाहिला गेला असून १४ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत.  लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  काय सांगता? तोंडावर मिशा उगवल्यामुळे या तरूणीला पुरूष समजताहेत लोक; गर्दीत जाताच होतं असं काही.....

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pak comedian video on how to speak like shashi tharoor gets epic reply asks to make on imran khan see viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.