Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे यातील गोष्टी किंवा रहस्य उलगडणं सगळ्यांसाठीच अवघड होतं. मात्र, या फोटोंमधील गोष्टी शोधण्यात एक वेगळीच गंमत असते. त्यामुळे हे फोटो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक अक्षर शोधायचं आहे.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे 4 हा अंक दिसत आहे. मात्र, यात केवळ 4 नसून एक इंग्रजीमधील अक्षरही आहे. ते म्हणजे A. हे अक्षर शोधण्यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ आहे. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील आणि तुम्ही जीनिअस असाल तर तुम्ही लगेच यातील वेगळं अक्षर शोधू शकाल.
जर तुम्हाला ठरलेल्या वेळेत म्हणजे ७ सेकंदात या फोटोतील वेगळं अक्षर दिसलं असेल, तर तुमचं अभिनंदन. पण जर अजूनही सापडलं नसेल तर निराशही होऊ नका. कारण ते कुठे आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खालच्या फोटोत ते तुम्ही बघू शकता.
वरच्या फोटोत वेगळं अक्षर सर्कल केलं आहे.