Optical Illusion: तुम्हाला या फोटोत काय दिसतं? उत्तरातून कळेल कशी आहे तुमची पर्सनॅलिटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 14:36 IST2022-05-16T14:35:03+5:302022-05-16T14:36:58+5:30
Optical Illusion Viral Photo: एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक हा फोटो बघून हैराण झाले आहेत. ही पेंटिंग पाहून लोक विचारात पडले आहेत, पण का ते तुम्हीच बघा.

Optical Illusion: तुम्हाला या फोटोत काय दिसतं? उत्तरातून कळेल कशी आहे तुमची पर्सनॅलिटी
Optical Illusion Viral Photo: ऑप्टिकल इल्यूजनचे कितीतरी फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे ऑप्टिकल इल्यूजन फोटो लोकांना भ्रमात टाकतात. लोक बराच वेळ या फोटोंकडे बघतात पण त्यांना त्यातील रहस्य काही उलगडत नाही. असा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक हा फोटो बघून हैराण झाले आहेत. ही पेंटिंग पाहून लोक विचारात पडले आहेत, पण का ते तुम्हीच बघा.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोमध्ये एक मुलगा पेंटिं करताना दिसत आहे. त्यासोबतच डोंगर, झोपडी, हिरवं गवत, झाडे आणि उडते पक्षीही दिसत आहेत. पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा हा फोटो बघता तेव्हा असं दिसतं की, एक चेहरा तुमच्याकडे बघत आहे.
युअर टॅंगो द्वारा जारी करण्यात आलेल्या या ऑप्टिकल इल्यूजनमधून हा संकेत देण्याचा दावा केला जातो की, लोक नात्यात सर्वात जास्त कुणाला घाबरतात. तुम्ही पहिल्यांदा एक रहस्यमय पेंटिंग बघता. एका पुरूषासारखा दिसणारा चेहरा एका मुलगा कॅनव्हाससारखा वापर केला जात आहे. हे आर्टवर्क प्रसिद्ध आर्टिस्ट ओलेग शुप्लियाक यांचं आहे. जर तुम्हाला पेंटिंगमध्ये एका मुलासोबत एक मोठा चेहराही दिसत असेल तर तुम्ही स्वभावाने एक केंद्रीत आणि उत्साही व्यक्ती आहात.
याचा अर्थ हा आहे की, तुम्ही वर्तमानाचा अधिक फायदा घेता आणि भूतकाळातील वाईट अनुभवांवर जास्त लक्ष देत नाहीत. मोठ्या चेहऱ्यातून हेच रहस्य समोर येतं. नकारात्मक मुद्दा हा आहे की, तुम्ही नेहमीच भावनात्मक ओझं असलेल्या व्यक्तीच्या रूपात दिसण्याला घाबरता. त्यामुळे तुम्ही वाद आणि असहमतीनंतर गप्प बसता. तुम्ही यावेळी हा विचार करता की, भांडणानंतर दूर राहणं सामान्य आहे. ज्य लोकांना आधी पेंटिंगमध्ये मुलगा दिसतो ते लोक स्वभावाने दिलखुलास असतात आणि त्यांना लोकांच्या आसपास राहणं पसंत असतं. तुम्ही कधी कधी चिंतेत असता कारण तुम्हाला वाटतं की, ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता, त्याची गरज जाणवत नाही.