Optical illusion : 'या' फोटोत लपवले आहेत चार इंग्रजी शब्द, १० सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 14:35 IST2024-06-19T14:34:47+5:302024-06-19T14:35:21+5:30
Optical Illusion : आज आम्ही तुमच्यासाठी चॅलेंज म्हणून घेऊन आलेल्या फोटोत तुम्हाला काही शब्द शोधणं फार मजेदार ठरणार आहे.

Optical illusion : 'या' फोटोत लपवले आहेत चार इंग्रजी शब्द, १० सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमधील गोष्टी शोधण्यात तुम्हाला खूपच डोकं लावावं लागतं आणि मेहनत घ्यावी लागते. कारण हे फोटो तुमच्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे तुम्हाला यातील गोष्टी सहजपणे शोधता येत नाहीत. हीच या फोटोंची खासियत आहे. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला इंग्रजीचे चार शब्द शोधायचे आहेत.
आज आम्ही तुमच्यासाठी चॅलेंज म्हणून घेऊन आलेल्या फोटोत तुम्हाला काही शब्द शोधणं फार मजेदार ठरणार आहे. तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक कपल दिसत आहे. पती सोफ्यावर बसून मोबाइल बघत आहे तर पत्नी पुस्तक बघत आहे. यातच एक श्वान आहे.
तुम्हाला या फोटोत चार शब्द शोधायचे आहेत. ज्यासाठी तुमच्याकडे १० सेकंदाची वेळ आहे. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील आणि तुम्ही जीनिअस असाल तर तुम्ही नक्कीच ठरलेल्या वेळेत यातील चार शब्द शोधू शकाल. चला तर मग लागा कामाला.
जर तुम्हाला १० सेकंदात या फोटोतील चार इंग्रजी शब्द सापडले असतील तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही चांगले आहेत. पण जर अजूनही चार शब्द सापडले नसतील तर निराश होऊ नका. कारण ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही ते चार शब्द बघू शकता.
या फोटोत तुम्हाला सर्कल केलेले चार इंग्रजी शब्द दिसत आहेत.