एकसारख्या दिसणाऱ्या 'या' दोन फोटोत आहे ३ फरक, १२ सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 15:22 IST2024-08-03T15:12:18+5:302024-08-03T15:22:19+5:30

Optical Illusion : एकसारख्या दिसणाऱ्या या दोन फोटोत तुम्हाला ३ फरक शोधायचे आहेत. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ १२ सेकंदाची वेळ आहे. 

Optical illusion : Spot the three differences in the image under 12 seconds | एकसारख्या दिसणाऱ्या 'या' दोन फोटोत आहे ३ फरक, १२ सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

एकसारख्या दिसणाऱ्या 'या' दोन फोटोत आहे ३ फरक, १२ सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच फेमस असतात. कारण हे फोटो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्याचं मनोरंजन करतात. हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे या फोटोंमधील गोष्टी सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. कारण या फोटोंमध्ये गोष्टी फारच हुशारीने लपवलेल्या असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला तीन फरक शोधायचे आहेत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. कधी यांमध्ये काही वस्तू, कधी प्राणी, कधी वेगळे नंबर तर कधी यातील फरक शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. एकसारख्या दिसणाऱ्या या दोन फोटोत तुम्हाला ३ फरक शोधायचे आहेत. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ १२ सेकंदाची वेळ आहे.

तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला दोन लहान मुले जे रस्ता क्रॉस करताना दिसत आहे. तर ट्रॅफिक लाईटही दिसत आहे. यातच तुम्हाला ३ फरक शोधायचे आहेत. पण हे काम वाटतं तेवढं सोपं नाही. तुम्हाला यासाठी फोटो बारकाईने बघावा लागेल. तेव्हा तुम्हाला यातील फरक दिसून येईल.

तुम्हाला जर एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोत तीन फरक दिसले असतील तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. पण जर अजूनही यातील फरक दिसले नसतील तर निराश होण्याचं कारणंही नाही. कारण यात काय फरक आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. फोटोतील फरक खालच्या फोटोत बघू शकता.

फोटोतील फरक सर्कल केले आहेत.
 

Web Title: Optical illusion : Spot the three differences in the image under 12 seconds