चॅलेंज! 5 सेकंदात शोधून दाखवा पोटातील C च्या गर्दीतील G हे अक्षर, शोधाल तर ठराल जीनिअस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 17:52 IST2025-08-28T17:51:58+5:302025-08-28T17:52:29+5:30

Optical Illusion : आता तुमच्यासमोर असलेल्या फोटो आपल्याला सगळीकडे 'C' हे अक्षर दिसत असेल, पण याचा C च्या गर्दीत 'G' हे अक्षर लपलं आहे.

Optical Illusion : spot the hidden letter G among the C's In 5 Seconds! | चॅलेंज! 5 सेकंदात शोधून दाखवा पोटातील C च्या गर्दीतील G हे अक्षर, शोधाल तर ठराल जीनिअस

चॅलेंज! 5 सेकंदात शोधून दाखवा पोटातील C च्या गर्दीतील G हे अक्षर, शोधाल तर ठराल जीनिअस

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जे आपलं मनोरंजन तर करतात, सोबतच मेंदू आणि डोळ्यांची कसरतही करतात. हे फोटो लोक सोशल मीडियावर शेअर करून त्यातील गोष्टी शोधण्याचं एकमेकांना चॅलेंज देत असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. त्यामुळे यातील गोष्टी सहजपणे शोधणं जरा अवघड होऊन बसतं. यातील गोष्टी शोधण्यासाठी तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागते. आता तुमच्यासमोर असलेल्या फोटो आपल्याला सगळीकडे 'C' हे अक्षर दिसत असेल, पण याचा C च्या गर्दीत 'G' हे अक्षर लपलं आहे. जे आपल्याला 5 सेकंदात शोधायचं आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी तुम्हाला यात एखादा प्राणी किंवा वस्तू शोधायची असते, तर यात वेगळे नंबर किंवा शब्द शोधायचे असतात. यात तुम्हाला वेगळं  अक्षर शोधायचं आहे. पण हे काम काही सोपं नाही. तुम्हाला फोटो खूप बारकाईने बघावा लागेल तेव्हा यात यश मिळेल.

फोटो तसा दिसायला सामान्यच आहे. पण यातील G शोधणं सोपं काम नाही. जर तुम्हाला ५ सेकंदात यातील वेगळं अक्षर दिसलं असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. जर अजूनही दिसलं नसेल तर निराश होऊ नका. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही G अक्षर शोधू शकता.

वरच्या फोटो G अक्षर सर्कल केलेलं आहे.

Web Title: Optical Illusion : spot the hidden letter G among the C's In 5 Seconds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.