पार्टीत गेस्टसोबतच एक चोरही आहे, शोधाल तर ठराल जीनिअस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 15:12 IST2023-12-08T15:11:53+5:302023-12-08T15:12:25+5:30

आज आम्ही तुमच्यासाठी जो फोटो घेऊन आलो आहोत त्याने तुमच्या मेंदुची चांगली कसरत होणार आहे. यात तुम्हाला एका चोराला शोधायचं आहे. 

Optical illusion : only detective mind person can find thief hidden in this party | पार्टीत गेस्टसोबतच एक चोरही आहे, शोधाल तर ठराल जीनिअस!

पार्टीत गेस्टसोबतच एक चोरही आहे, शोधाल तर ठराल जीनिअस!

Find Out Thief: सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो खूप लोकांना आवडतात. कारण याने मेंदुला चॅलेंज तर मिळतंच सोबतच फोकस करण्यास आणि तुमचा दृष्टीकोन सुधारण्यासही मदत मिळते. काही फोटोंच्या माध्यमातून तुमच्या डोळ्यांची एक्सरसाइजही होते. आज आम्ही तुमच्यासाठी जो फोटो घेऊन आलो आहोत त्याने तुमच्या मेंदुची चांगली कसरत होणार आहे. यात तुम्हाला एका चोराला शोधायचं आहे. 

तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एका घरात पार्टी सुरू असल्याचं दिसत आहे. बघून असं वाटत आहे की, हॅलोवीन किंवा घोस्ट थीम पार्टी सुरू आहे. या पार्टीतील पाहुण्यांमध्ये एक चोरही आहे. ज्याला तुम्हाला 7 सेकंदात शोधायचं आहे. फोटो जरी सोपा वाटत असला तरी यातील चोराला शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.

आम्हाला आशा आहे की, आतापर्यंत तुम्ही या फोटोतील चोर शोधला असेल. पण तुम्ही असंकेलं असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण ज्या लोकांना अजूनही या फोटोतील चोर दिसला नसेल तर निराश होऊ नका. यातील चोर शोधण्यासाठी आम्ही तुमची मदत करू. चोर कुठे आहे ते तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता.

Web Title: Optical illusion : only detective mind person can find thief hidden in this party