Optical illusion : या फोटोत लपले आहेत 10 चेहरे, तुम्हाला किती दिसले? फार कमी लोकांनी दिलंय बरोबर उत्तर....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 14:37 IST2022-06-10T14:33:39+5:302022-06-10T14:37:30+5:30
Optical Illusion : अशा फोटोंबाबत सोशल मीडियावर लोकांना पझल्स खेळण्यास फार मजा येते. आज आम्ही तुमच्यासमोर असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. या फोटोत एक झाडाचं चित्र दिसतंय.

Optical illusion : या फोटोत लपले आहेत 10 चेहरे, तुम्हाला किती दिसले? फार कमी लोकांनी दिलंय बरोबर उत्तर....
Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच असे फोटो समोर येत असतात, जे बघायला तर सामान्य वाटतात पण या फोटोंमध्ये इतरही काही रहस्य दडलेले असतात. अशाच फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन असं म्हटलं जातं. हे फोटो असे असतात जे बघून भ्रम निर्माण होतो आणि कधी कधी तर डोकंही चक्रावून जातं.
अशा फोटोंबाबत सोशल मीडियावर लोकांना पझल्स खेळण्यास फार मजा येते. आज आम्ही तुमच्यासमोर असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. या फोटोत एक झाडाचं चित्र दिसतंय. पण मुळात त्यात दहा चेहरे लपले आहेत. हे 10 चेहरे तुम्हाला शोधायचे आहेत.
या फोटोकडे पहिल्यांदा बघाल तर हेच जाणवेल की, हा फोटो एका झाडाचा आहे. पण जेव्हा तुम्ही बारकाईने लक्ष देऊन हा फोटो बघाल तेव्हा लक्षात येईल की, यात काही चेहरे लपले आहेत.
बऱ्याच लोकांना या फोटोकडे बारकाईने पाहिल्यावर त्यांना चार चेहरे तर सहजपणे दिसतात. पण या फोटोत चारपेक्षा जास्त चेहरे आहेत. फोटोत एकूण 10 चेहरे आहेत. बघा तुम्हाला किती दिसतात.