फोटोतील 2016 नंबरच्या गर्दीत शोधा वेगळा नंबर, आपल्याकडे आहे केवळ 10 सेकंदाची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 16:49 IST2025-10-07T16:48:26+5:302025-10-07T16:49:49+5:30

Optical Illusion : एक फोटो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. पण हे काम वाटतं तेवढं सोपंही नाही.

Optical Illusion : Find Out the Hidden “2106” Odd Number in Seas of “2016” | फोटोतील 2016 नंबरच्या गर्दीत शोधा वेगळा नंबर, आपल्याकडे आहे केवळ 10 सेकंदाची वेळ

फोटोतील 2016 नंबरच्या गर्दीत शोधा वेगळा नंबर, आपल्याकडे आहे केवळ 10 सेकंदाची वेळ

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन किंवा ब्रेन टीझर फोटो म्हणजे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो खूपच मजेदार, मनोरंजन करणारे, मेंदूची व डोळ्यांची कसरत करणारे असतात. कारण यातील गोष्टी शोधण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. असाच एक फोटो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. पण हे काम वाटतं तेवढं सोपंही नाही.

आम्ही जो फोटो आपल्यासाठी घेऊन आलो आहोत, त्यात आपल्याला सगळीकडे 2016 हा नंबर दिसत असेल. पण खरी गंमत ही आहे की, या फोटोत केवळ 2016 हा नंबर नाहीये. तर एक वेगळा नंबर आहे जो आपल्याला 10 सेकंदात शोधायचा आहे आणि तो वेगळा नंबर म्हणजे 2106 हा आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. काही फोटोंमध्ये तुम्हाला काही वस्तू शोधायच्या असतात, तर काही फोटोंमध्ये तुम्हाला फरक शोधायचे असतात तर काहींमध्ये तुम्हाला वेगळे नंबर शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. ज्यात तुम्हाला वेगळा नंबर शोधायचा आहे.

हे फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे यातील गोष्टी समोर असूनही सहजपणे दिसत नाही. तुम्हाला पूर्ण लक्ष देऊन बारकाईने फोटो बघावा लागतो. तेव्हाच तुम्ही या फोटोतील गोष्टी शोधू शकता.

आपल्याला जर 10 सेकंदात 2106 हा नंबर दिसला असेल तर आपलं अभिनंदन, जर अजूनही दिसला नसेल तर निराश होऊ नका. कारण तो कुठे आहे हे आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत तो आपण बघू शकता.

वरच्या फोटोत वेगळा नंबर सर्कल केला आहे.

Web Title : 2016 के नंबरों की भीड़ में अलग नंबर खोजें, आपके पास हैं केवल 10 सेकंड!

Web Summary : ऑप्टिकल इल्यूजन: 2016 के समुद्र में छिपे 2106 नंबर को पहचानें। केवल 10 सेकंड में अपनी अवलोकन कौशल का परीक्षण करें! जवाब दिया गया है।

Web Title : Find the Odd Number Among 2016s in 10 Seconds!

Web Summary : Optical illusion: Spot the number 2106 hidden within a sea of 2016s. Test your observation skills in just 10 seconds! The answer is provided.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.