चॅलेंज! तुमची नजर तीक्ष्ण आहे का? शोधून दाखवा फोटोत लपवलेले ४ जीव, ठराल जीनिअस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 15:10 IST2025-06-27T15:01:25+5:302025-06-27T15:10:02+5:30

Optical Illusion : आज आम्ही तुमच्यासाठी एक असा फोटो घेऊन आलो आहोत, ज्यात तुम्हाला ४ वेगवेगळ्या प्राण्यांना शोधायचं आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ ५ सेकंद वेळ आहे.

Optical Illusion : Find hidden animals in this photo in 5 second | चॅलेंज! तुमची नजर तीक्ष्ण आहे का? शोधून दाखवा फोटोत लपवलेले ४ जीव, ठराल जीनिअस...

चॅलेंज! तुमची नजर तीक्ष्ण आहे का? शोधून दाखवा फोटोत लपवलेले ४ जीव, ठराल जीनिअस...

Optical Illusion : आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांकडे आपल्या आजूबाजूला बघण्यासाठी देखील वेळ नसतो. घोड्यांसारखे डोळ्यांना झापडं बांधून ते सरळ नाकाच्या रेषेत चालत राहतात. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींकडे त्यांचं लक्षही जात नाही. पण काही पझल्स किंवा काही कसरती करून आपल्याला लक्ष केंद्रीत करण्यास मदत मिळते. रिसर्चनुसार, पझल्स किंवा ऑप्टिकल इल्यूजन सॉल्व केल्यानं मेंदूचं आरोग्य आणि स्मरणशक्ती वाढते. तसेच विसरण्याच्या आजार होण्याचा धोकाही कमी होतो. अशात आज आम्ही तुमच्यासाठी एक असा फोटो घेऊन आलो आहोत, ज्यात तुम्हाला ४ वेगवेगळ्या प्राण्यांना शोधायचं आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ ५ सेकंद वेळ आहे.

हे ब्रेनटीजर प्लेबज (PlayBuzz) नं हा फोटो डिझाइन केला आहे. असं सांगितलं जातं की, केवळ दोन टक्के लोकांनीच हा फोटो योग्यपणे सॉल्व करू शकले. जर तुम्ही सुद्धा जीनिअस असाल, तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्हीही यातील प्राणी शोधून दाखवा. या शांत आणि सुंदर फोटोत तुम्हाला समुद्राचा एक किनारा दिसत आहे. एक छोटा डोंगर आहे आणि दूर काही जहाजही आहेत. पण या सगळ्यात चलाखीने ४ प्राणी लपवण्यात आले आहेत.

वर दिलेला फोटो तुम्ही बारकाईने बघाल तर नक्कीच तुम्हाला यात यश मिळेल. पण हेही लक्षात ठेवा की, यातील प्राणी शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ ५ सेकंदाची वेळ आहे. अर्थातच हे काही सोपं काम नाही. त्यासाठी तुम्हाला फोटो डोळ्यात तेल घालून बारकाईनं बघावा लागेल. चला आम्ही तुमच्यासाठी हे काम जरा सोपं करतो. यात एक हरिण आहे, एक कोल्हा आहे, एक वटवाघुळ आणि एक फ्लेमिंगो आहे. यातील तीन जीव डोंगरात लपले आहेत. तर फ्लेमिंगो किनाऱ्यावर आहे. 

जर तुम्हाला बराच वेळ घेऊनही यातील जीव दिसले नसतील तर निराश होऊ नका. कारण ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. जर तुम्हाला ५ सेकंदात यातील दिसले असतील तर तुमचं अभिनंदन. पण दिसले तर खालच्या फोटोत तुम्ही ते जीव बघू शकता.

फोटोत लपवण्यात आलेले जीव फोटो सर्कल केले आहेत. 

Web Title: Optical Illusion : Find hidden animals in this photo in 5 second