बागेच्या या फोटोत लपून बसलंय फुलपाखरू, 7 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 14:49 IST2024-05-30T14:48:39+5:302024-05-30T14:49:54+5:30
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर असलेल्या गोष्टी आपल्याला सहजपणे दिसत नाहीत.

बागेच्या या फोटोत लपून बसलंय फुलपाखरू, 7 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो तुमच्या डोळ्यांच्या आणि मेंदुच्या आरोग्यासाठी चांगले असतात असं म्हटलं तर चूक ठरणार नाही. कारण या फोटोंच्या माध्यमातून डोळ्यांची आणि मेंदुची चांगलीच कसरत होते. तसेच तुमची आयक्यू टेस्टही होते. त्यामुळेच हे फोटो सगळ्यांना आवडतात. कधी यात काही शोधायचं असतं तर कधी या फोटोतील फरक शोधायचे असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला एक फुलपाखरू शोधायचं आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर असलेल्या गोष्टी आपल्याला सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधाव्या लागतात. असंच यातही करायचं आहे. हा एका बागेतील फोटो आहे. त्यात अनेक गोष्टी आहेत. त्यातच एक फुलापाखरू देखील आहे.
तुमच्या समोर असलेल्या फोटोत काही झाडी, पाण्याचं डबकं, पाणी, पाण्यात कमळाची फुलं अशा अनेक गोष्टी दिसत आहेत. पण यात एक फुलपाखरू लपून बसलं आहे जे तुम्हाला 7 सेकंदात शोधायचं आहे. पण हे इततकंही सोपं काम नाही. तुम्हाला हे फुलपाखरू शोधण्यासाठी बरीच मेहनत करावी लागणार आहे.
जर तुम्हाला या फोटोतील लपलेलं फुलपाखरू दिसलं असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. तुम्ही जीनिअस आहात. पण जर अजूनही तुम्हाला यातील फुलपाखरून दिसलं नसेल तर निराश किंवा अपयशी झाल्यासारखं वाटून घेऊ नका. तुम्हाला नक्कीच दुसऱ्या एखाद्या चॅलेंजमध्ये यश मिळेल. सध्या या फोटोत फुलपाखरू कुठे आहे हे तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता.