Optical illusion : फोटोत एकूण कोंबड्या किती सांगा आणि जीनिअस ठरा, तेही फक्त 15 सेकंदात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 12:58 IST2025-10-11T12:35:56+5:302025-10-11T12:58:02+5:30
Optical Illusion : फोटोमध्ये तीन लाइनमध्ये कोंबड्या दिसत आहेत. पण याचं उत्तर अवघड आहे. जास्तीत जास्त लोक कोंबड्यांची बरोबर संख्या सांगण्यात अपयशी ठरले आहेत.

Optical illusion : फोटोत एकूण कोंबड्या किती सांगा आणि जीनिअस ठरा, तेही फक्त 15 सेकंदात!
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटोमधील गोष्टी शोधणं किंवा त्यातील रहस्य उलगडणं अनेकांना आवडतं. हा त्यांचा टाइमपास करण्याचा एक हेल्दी ऑप्शन असतो. कारण याद्वारे त्यांचा मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. पण हे काम वाटतं तेवढं सोपंही नसतं. यात लपलेल्या गोष्टी शोधणं खरंच अवघड असतं. पण त्यातच खरी मजा असते. सुरूवातीला तर फोटो साधेसोपे वाटतात, पण त्यात जे दिसतं ते तसं नसतं. जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा सगळेच हैराण होतात.
Pinterest ने एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यात किती कोंबड्या आहेत हे सांगायचं आहे. फोटोमध्ये तीन लाइनमध्ये कोंबड्या दिसत आहेत. पण याचं उत्तर अवघड आहे. जास्तीत जास्त लोक कोंबड्यांची बरोबर संख्या सांगण्यात फेल झाले आहेत. तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही जीनिअस आहात तर 15 सेकंदात यातील कोंबड्यांची बरोबर संख्या सांगा.
फोटोत आपण बघू शकता की, तीन लाइनमध्ये उभ्या असलेल्या कोंबड्या दिसत आहेत. कशाही मोजल्या तरी लाइनमध्ये तुम्हाला तीन तीनच कोंबड्या दिसतील. पण जर कोंबड्या मोजणं सोपं असतं तर मग चॅलेंजमध्ये काय मजा आली असती?
तुम्हाला बरोबर उत्तर शोधायचं असेल तर फार बारकाईने फोटो बघावा लागेल.
पहिल्या नजरेत बघाल तर फोटोत तुम्हाला एकूण 9 कोंबड्या दिसतील. पण मुळात यात 9 पेक्षा जास्त कोंबड्या आहेत. फोटो बारकाईने बघाल तेव्हा तुम्हाला यात एकूण 21 कोंबड्या दिसतील.
पहिल्या लाइनमध्ये 7 कोंबड्या आहेत, दुसऱ्या लाइनमध्ये 8 कोंबड्या आणि तिसऱ्या लाइनमध्ये 6 कोंबड्या आहेत. तिन्ही लाइनमध्ये कोंबड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. खालच्या फोटोत तुम्ही उत्तर बघू शकता.
वरच्या फोटोत उत्तर बघू शकता.