चॅलेंज! १० सेकंदात हत्तींच्या गर्दीत शोधून दाखवा एक गेंडा, शोधाल तर ठराल जीनिअस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 13:31 IST2024-09-14T13:08:24+5:302024-09-14T13:31:02+5:30

Optical Illusion: ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये गोष्टी शोधणं एक मजेदार काम असतं. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक गेंडा शोधायचा आहे.

Optical illusion : Find a rhinoceros among the elephants within 10 seconds | चॅलेंज! १० सेकंदात हत्तींच्या गर्दीत शोधून दाखवा एक गेंडा, शोधाल तर ठराल जीनिअस!

चॅलेंज! १० सेकंदात हत्तींच्या गर्दीत शोधून दाखवा एक गेंडा, शोधाल तर ठराल जीनिअस!

Optical Illusion: ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर तुम्ही नेहमीच पाहिले असतील. ज्यांमध्ये तुम्हाला काही गोष्टी शोधायच्या असतात. अनेकदा लोक लगेच यांमधील रहस्य उलगडतात तर कधी कधी बराच वेळ घेऊनही त्यांना यातील गोष्टी सापडत नाहीत. ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये गोष्टी शोधणं एक मजेदार काम असतं. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक गेंडा शोधायचा आहे.

तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला खूपसारे हत्ती दिसत आहेत. हे सगळेच एका तलावाकाठी एन्जॉय करत आहेत. मात्र, यात केवळ हत्ती नाहीत. यात एक गेंडाही लपला आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे १० सेकंदाची वेळ आहे.  जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर वेळीच तुम्ही यातील गेंडा शोधू शकाल.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे या फोटोंद्वारे तुमचं चांगलं मनोरंजन तर होतंच, सोबतच तुमचे डोळे आणि मेंदुची चांगली कसरतही होते. इतकंच नाही तर तुमची आयक्यू टेस्टही होते. त्यामुळेच असे फोटो लहानांसोबतच मोठ्यांनाही खूप आवडतात. 

जर तुम्हाला या फोटोत ठरलेल्या वेळेत म्हणजे १० सेकंदात हत्तींच्या गर्दीतील गेंडा दिसला असेल तर तुमचं अभिनंदन. पण जर अजूनही दिसला नसेल तर निराशही होऊ नका. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही तो बघू शकता.

हत्तींच्या गर्दीत लपलेला गेंडा वरच्या फोटो सर्कल केला आहे. 
 

Web Title: Optical illusion : Find a rhinoceros among the elephants within 10 seconds