Optical Illusion : 10 सेकंदात शोधा फोटोतील वेगळा अंक, अनेकजण प्रयत्न करून झाले फेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 14:34 IST2024-07-04T14:03:49+5:302024-07-04T14:34:37+5:30
Optical Illusion : एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.

Optical Illusion : 10 सेकंदात शोधा फोटोतील वेगळा अंक, अनेकजण प्रयत्न करून झाले फेल!
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन किंवा पझल्स गेम्स नेहमीच लोकांच्या आवडीचा विषय ठरत असतात. कारण यातून मनोरंजनही होतं आणि लोकांच्या मेंदू व डोळ्यांची चांगली कसरतही होते. त्यामुळे सोशल मीडियावर असे फोटो शेअर करून लोक एकमेकांना चॅलेंज देत असतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. कधी या फोटोंमध्ये तुम्हाला काही वस्तू, तर कधी लपवलेले प्राणी शोधायचे असतात तर काही फोटोंमध्ये तुम्हाला फरक व काहींमध्ये वेगळे नंबर शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. यात तुम्हाला 1 हा वेगळा नंबर शोधायचा आहे. पण हे काही सोपं काम नाही. यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाची वेळ आहे.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला खूपसारे 7 नंबर दिसत आहेत. पण यात केवळ 7 हाच आकडा नाहीये. यात एक वेगळा नंबर आहे तो म्हणजे 1. हा नंबर शोधण्याचं तुम्हाला आज चॅलेंज आहे. अशा फोटोंबाबत होतं असं की, एकसारख्या दिसणाऱ्या खूप गोष्टी एकत्र दिसल्या की, कन्फ्यूज व्हायला होतं. तेच इथे होतं. त्यामुळे हे काम जरा अवघड होतं. पण जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही नक्कीच यातील वेगळा नंबर शोधू शकाल.
जर तुम्ही 10 सेकंदात या फोटोतील वेगळा शब्द म्हणजे 1 शोधला असेल तर तुमचं खूप अभिनंदन आणि तुमचे डोळेही खूप तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही सापडला नसेल तर निराश होऊ नका. कारण त्याला शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही तो कुठे आहे हे बघू शकता.