Optical Illusion : फोटोतील कार शोधण्यात ९९ टक्के लोक फेल, हिंमत असेल तर १५ सेकंदात शोधून दाखवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:15 IST2025-12-30T15:14:32+5:302025-12-30T15:15:57+5:30
Optical Illusion : आपल्या मनोरंजनासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला १५ सेकंदात एक कार शोधायची आहे.

Optical Illusion : फोटोतील कार शोधण्यात ९९ टक्के लोक फेल, हिंमत असेल तर १५ सेकंदात शोधून दाखवा
Optical Illusion : अनेकदा आपल्यासोबत असं होतं की, आपण एखाद्या गोष्टीकडे बघतो त्यात जे आहे ते न दिसता वेगळंच काहीतरी दिसतं. म्हणजेच काय तर आपल्याला भ्रम होतो. कन्फ्यूज व्हायला होतं. बऱ्याच फोटोंबाबतही असं होतं. याच फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हणतात. म्हणजे काय तर हे फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. आम्ही सुद्धा आपल्या मनोरंजनासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला १५ सेकंदात एक कार शोधायची आहे.
हा ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक यूजर्सनी हा फोटो शेअर करून यातील कार शोधण्याचं चॅलेंजही दिलं आहे. बऱ्याच लोकांना तर बराच वेळ शोधूनही यातील कार दिसली नाही. जास्तीत जास्त लोक फोटोतील कारण शोधण्यात कन्फ्यूज झालेत. चला आपणही ट्राय करा.

व्हायरल होणारे हे फोटो लोकांना कन्फ्यूज करतात, त्यामुळे त्यातील गोष्टी शोधणं जरा अवघडच असतं. पण अशक्य नसतं. या फोटोंची खासियत म्हणजे यातील गोष्टी शोधता शोधता डोळे आणि् मेंदूची चांगली कसरतही होते. इतकंच नाही तर आपली आयक्यू लेव्हल टेस्टही होते.

या फोटोने नक्कीच आपल्याला खूप कन्फ्यूज केलं असेल. कारण यातील कार शोधणं काही सोपं काम नाही. पण जर आपण बारकाईने फोटो पाहिला तर नक्कीच आपल्याला यातील कार दिसेल.
जर आपल्याला या फोटोत लपवण्यात आलेली कार १५ सेकंदात दिसली असेल तर खरंच आपले डोळे खूप तीक्ष्ण आहे. पण जर शोधून शोधून दमले असाल आणि तरीही कार दिसली नसेल तर निराश होऊ नका. कारण ती कार कुठे आहे हे आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. फोटोतील कार खालच्या फोटोत बघू शकता.

वरच्या फोटोत कार सर्कल केलेली आहे.