जास्तीत जास्त लोक शोधून थकले, पण दिसला नाही फोटोतील वेगळा नंबर, बघा तुम्हीही ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 15:48 IST2024-11-07T15:39:31+5:302024-11-07T15:48:50+5:30

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे या फोटोतील गोष्टी समोर असूनही सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधाव्या लागतात.

Optical illusion : Find 88 in photo of 89 in 7 seconds | जास्तीत जास्त लोक शोधून थकले, पण दिसला नाही फोटोतील वेगळा नंबर, बघा तुम्हीही ट्राय करा!

जास्तीत जास्त लोक शोधून थकले, पण दिसला नाही फोटोतील वेगळा नंबर, बघा तुम्हीही ट्राय करा!

Optical Illusion : सोशल मीडियावर व्हायरल होणारे ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे नेहमीच उत्सुकतेचा विषय असतात. कारण हे फोटो सॉल्व करणं किंवा यांमधील गोष्टी शोधणं सगळ्यांनाच आवडतं. कारण यातून चांगलं मनोरंजन तर होतंच, सोबतच आयक्यू टेस्टही होते. त्यामुळे असे फोटो लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही आवडतात. असाच एक फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. 

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे या फोटोतील गोष्टी समोर असूनही सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधाव्या लागतात. या फोटोंमध्ये वेगवेगळ्या गोष्टी शोधायच्या असतात. कधी यांमध्ये वस्तू किंवा प्राणी, कधी दोन फोटोतील फरक तर कधी चोर. मात्र, आज आम्ही तुमच्यासाठी जो फोटो घेऊन आहोत, त्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदाची वेळ आहे.

तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्ही बघू शकता की, त्यात तुम्हाला सगळीकडे 89 हा नंबर दिसत आहे. या ८९ च्या गर्दीत एक वेगळाही नंबर आहे. तो म्हणजे 88. हाच नंबर तुम्हाला तुम्हाला 7 सेकंदात शोधायचा आहे. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही लगेच यातील वेगळा नंबर शोधू शकता.

जर तुम्ही ठरलेल्या वेळेत फोटोतील वेगळा नंबर शोधला असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. तुमचं अभिनंदन. पण जर अजूनही वेगळा नंबर दिसला नसेल तर निराश होऊ नका. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तो तुम्ही बघू शकता.

वेगळा नंबर वरच्या फोटोत सर्कल केला आहे. 
 

Web Title: Optical illusion : Find 88 in photo of 89 in 7 seconds