जंगलात अस्वलांसोबत लपला आहे एक मनुष्य, नजर तीक्ष्ण असेल तरच शोधू शकाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 09:24 IST2023-03-13T09:20:02+5:302023-03-13T09:24:11+5:30
Optical Illusion : यात फोटोत तुम्हाला एक मनुष्य शोधायचा आहे. या फोटोत तुम्हाला काही अस्वल दिसत आहेत आणि काही झाडांवर आहेत तर खाली जमिनीवर आहेत. त्यांच्यात एक मनुष्य लपला आहे.

जंगलात अस्वलांसोबत लपला आहे एक मनुष्य, नजर तीक्ष्ण असेल तरच शोधू शकाल!
Hidden Human Among Bears : भलेही ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमधील रहस्य उलगडण्यात लोक वैतागतात, पण हा खेळ खेळण्यात सगळ्यांना मजा येते. याने मनोरंजर तर होतंच सोबतच तुमच्या मेंदू आणि नजरेचीही टेस्ट होते. असाच एक खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात फोटोत तुम्हाला एक मनुष्य शोधायचा आहे. या फोटोत तुम्हाला काही अस्वल दिसत आहेत आणि काही झाडांवर आहेत तर खाली जमिनीवर आहेत. त्यांच्यात एक मनुष्य लपला आहे.
नुकताच हा ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यूजर एकमेकांना यातील मनुष्य शोधण्याचं चॅलेंज देत आहेत. यात तुम्हाला जंगलातील काही अस्वल दिसत आहेत, त्यात एक लहान अस्वलही आहे. काही अस्वल झाडांवर चढताना दिसत आहेत.
मजेदार बाब म्हणजे यात लपलेला मनुष्य मनुष्यासारखा दिसत नाहीये. त्यामुळे त्याला शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. इतकंच नाही तर तुमची नजरही तीक्ष्ण असायला हवी आणि मेंदूही शार्प असायला हवा. तेव्हाच तुम्हाला हे शक्य होऊ शकेल.
हा फोटोत फारच अवघड आहे. जर तुम्हाला अजूनही यातील मनुष्य दिसला नसेल तर उत्तर आम्ही सांगतो. उजव्या बाजूच्या झाडांवर दोन अस्वल दिसत आहेत. त्यातील वरचं अस्वल मनुष्य आहे. ते अस्वल नाही तर मनुष्य आहे. त्याने अस्वलासारखे दिसणारे कपडे घातले आहेत. लक्ष देऊन पाहिलं तर लक्षात येईल तो कॉच्युम आहे. हा फोटो असा डिझाइन केला आहे की, मनुष्य दिसूच नये.