नजर तीक्ष्ण असेल तरच शोधून शकाल फोटोतील ३ पाय असलेले घोडे, १५ सेकंदाची आहे वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 12:47 IST2025-03-03T12:47:02+5:302025-03-03T12:47:32+5:30
Optical Illusion : एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला तीन पाय असलेले काही घोडे शोधायचे आहेत.

नजर तीक्ष्ण असेल तरच शोधून शकाल फोटोतील ३ पाय असलेले घोडे, १५ सेकंदाची आहे वेळ!
Optical Illusion : सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओसोबतच ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटोही लोकांना खूप आवडतात. कारण या फोटोंच्या माध्यमातून चांगलं मनोरंजनही होतं आणि मेंदुची चांगली कसरतही होते. त्यामुळे लहान मुलांसोबतच मोठ्यांना सुद्धा असे फोटो आवडतात आणि ते व्हायरल होत असतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला तीन पाय असलेले काही घोडे शोधायचे आहेत.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला घोड्यांचे काही फोटो दिसत आहेत. ते धावत आहेत. यातील तुम्हाला ३ पाय असलेले काही घोडे शोधायचे आहेत. ज्यासाठी तुमच्याकडे १५ सेकंद आहेत. पण तुम्हाला वाटतं तेवढं हे सोपं काम नाही. ते शोधण्यासाठी तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागेल.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. जेव्हा एकसारख्या दिसणाऱ्या अनेक गोष्टी समोर येतात तेव्हा असं कन्फ्यूजन होत असतं. खूप बारकाईनं फोटो पाहिल्यानंतर यात लपवण्यात आलेल्या गोष्टी सापडतात. बरेच लोकांना तासंतास वेळ घालवूनही यातील गोष्टी सापडत नाही. तुमची नजर जर तीक्ष्ण असेल तर तुम्हाला नक्कीच दिसेल.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची एक खासियत म्हणजे यातील गोष्टी शोधताना चांगला टाईमपास, मनोरंजन होतं. सोबतच डोळे आणि मेंदुची कसरतही होते. आयक्यू टेस्टही होते. जर तुम्हाला या फोटोत तीन पाय असलेले काही घोडे दिसले असतील तर तुमचं अभिनंदन. पण जर अजूनही दिसले नसतील तर निराश होऊ नका. कारण ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही ते बघू शकता.
वरच्या फोटोत यातील ३ पाय असलेले घोडे सर्कल केलेले आहेत.