या फोटोत लपवला आहे एक बॉल, जीनिअस असाल तर 7 सेकंदात शोधून दाखवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 13:52 IST2023-09-11T13:42:01+5:302023-09-11T13:52:35+5:30
Optical Illusion : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला एक बॉल शोधायचा आहे.

या फोटोत लपवला आहे एक बॉल, जीनिअस असाल तर 7 सेकंदात शोधून दाखवा!
Optical Illusion Challenge : सोशल मीडियावर भ्रमित करणाऱ्या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन म्हटलं जातं. असे फोटो सोशल मीडियावर नेहमीच शेअर केले जातात. जे सॉल्व करण्यात सगळ्यांनाच मजा येते. अशा फोटोंमध्ये तुम्हाला काही लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर काही फोटोंमध्ये चुका शोधायच्या असतात. पण यात तुमचा चांगलाच कस लागतो. कारण हे काम काही सोपं नसतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला एक बॉल शोधायचा आहे.
जो फोटो तुमच्यासमोर आहे त्यात बऱ्याच गोष्टी तुम्हाला दिसतात. हा फोटो असा बनवण्यात आला आहे जेणेकरून लोक तो बघून कन्फ्यूज व्हावेत. यातच तुम्हाला एक फोटो शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदाची वेळ आहे.
हे ट्रिकी चॅलेंज Bright Side वर शेअर करण्यात आलं आहे. हा फोटो एका आजीच्या रंगीबेरंगी रूमचा आहे. ज्यात ती सोफ्यावर बसून मफलर विणत आहेत. सगळीकडे वेगवेगळ्या वस्तू आहेत. यातच एक बॉल लपवून ठेवला आहे. तुमचे जर डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही यातील बॉल लगेच शोधू शकाल.
ज्यांना यातील बॉल दिसला असेल ते खरंच जीनिअस आहेत. पण ज्यांना अजूनही यातील बॉल सापडला नाही. त्यांनी निराश होण्याची गरज नाही. त्यांना बॉल शोधण्यात आम्ही मदत करू. खालच्या फोटोत बॉल कुठे आहे हे तुम्ही बघू शकता.