या फोटोत लपली आहे एक छत्री, भलेभले शोधून थकले पण त्यांना काही दिसली नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 18:15 IST2022-09-01T18:12:57+5:302022-09-01T18:15:10+5:30
Optical Illusion : सध्या असाच एक कन्फ्यूज करणारा ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल झाला आहे. यातील रहस्य उलगडण्यासाठी लोक बरीच मेहनत घेत आहेत. हे तुम्हीही ट्राय करू शकता.

या फोटोत लपली आहे एक छत्री, भलेभले शोधून थकले पण त्यांना काही दिसली नाही!
Optical Illusion : सोशल मीडियावर वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. यातील रहस्य किंवा प्रश्न शोधता शोधता अनेकांच्या नाही नऊ येतात. डोकं चक्रावतं पण बरोबर उत्तर काही सापडत नाही. सध्या असाच एक कन्फ्यूज करणारा ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल झाला आहे. यातील रहस्य उलगडण्यासाठी लोक बरीच मेहनत घेत आहेत. हे तुम्हीही ट्राय करू शकता.
या फोटोत तुम्ही एकत्र अनेक गोष्टी दिसतात. यात जंगल, हिरवीगार झाडी, काही जंगली प्राणी सोबतच काही लोकही दिसत आहेत. या सर्व गोष्टींसोबत या फोटोत एक छत्री लपली आहे. पण ती तुम्हाला सहजपणे दिसणार नाही.ही छत्री तुम्हाला शोधावी लागणार आहे. हे तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही डोकं शांत ठेवून, बारकाईने फोटो बघाल.
जर तुम्हाला बराच प्रयत्न करूनही या फोटोतील छत्री दिसली नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. फोटोत उजव्या बाजूला तुम्ही छत्री शोधू शकता. आता हिंट दिल्यावर तुम्हाला छत्री दिसली असेल तर तुम्हाला शुभेच्छा. याचा अर्थ तुमचे डोळे फारच तीक्ष्ण आहेत.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या फोटोतील छत्री शोधणाऱ्या लोकांची संख्या फारच कमी आहे. या फोटोला डिझाइनच असं केलं आहे की, छत्री तुमच्या डोळ्यापासून दूर असेल. पण तरीही तुम्ही प्रयत्न करणं काही सोडू नका.