Optical Illusion: या फोटोत लपली आहे मासे पकडणारी एक व्यक्ती, तीक्ष्ण डोळे असतील तर शोधा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 17:27 IST2022-09-12T17:23:34+5:302022-09-12T17:27:37+5:30
Optical Illusion : तुम्हाला या फोटोत एक मोठा पक्षी दिसत आहे. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, या फोटोत एक व्यक्ती आणि एक मोठा मासाही लपलेला आहे.

Optical Illusion: या फोटोत लपली आहे मासे पकडणारी एक व्यक्ती, तीक्ष्ण डोळे असतील तर शोधा!
Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच डोकं चक्रावून सोडणारे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. यातील फोटोवरून तुमच्या पर्सनॅलिटीबाबतही खुलासा होतो. बरेच लोक तासंतास वेळ घालवून या फोटोंमधील रहस्य सॉल्व करण्याचा प्रयत्न करतात. पण काहीच लोक या फोटोमधील रहस्य दूर करण्यात यशस्वी ठरतात. या ऑप्टिकल इल्यूजन फोटोमध्ये तुम्हाला एक मासे पकडणारा माणूस शोधायचा आहे.
तुम्हाला या फोटोत एक मोठा पक्षी दिसत आहे. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, या फोटोत एक व्यक्ती आणि एक मोठा मासाही लपलेला आहे. तुम्ही जेवढ्या लवकर मासे पकडणारा माणूस आणि मासा शोधाल यावरून हे स्पष्ट होईल की, तुमचा मेंदू आणि तुमचे डोळे किती तीक्ष्ण आहेत.
या फोटोकडे तुम्ही बारकाईने आणि डोकं शांत ठेवून बघाल तरच तुम्हाला यातील लपलेल्या गोष्टी दिसू शकतील. जर तुम्ही अनेक प्रयत्न केले आणि तरीही तुम्हाला यातील माणूस आणि मासा दिसला नसेल तर जरा आउट ऑफ द बॉक्स विचार करा. दोन्ही गोष्टी समोरच आहेत. पण तुम्हाला नेहमीपेक्षा जरा वेगळा विचार करावा लागेल. तरीही तुम्हाला रहस्य उलगडता आलं नाही तर उत्तर खालच्या फोटोत दिलेलं आहे.
यातील व्यक्ती आणि मासा शोधण्यासाठी तुम्हाला फोटो उलटा करून बघावा लागेल.