'या' फोटोत तुम्हाला एक हत्ती दिसतोय का? चॅलेंज पूर्ण करणारा ठरेल जीनिअस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 13:21 IST2024-01-18T13:18:02+5:302024-01-18T13:21:24+5:30

Optical Illusion :फोटोत हत्ती अगदी तुमच्या डोळ्यांसमोरच आहे, पण जास्तीत जास्त लोक या हत्तीला शोधण्यात फेल झाले आहेत.

Optical Illusion : Can you spot hidden elephant in image eye vision games | 'या' फोटोत तुम्हाला एक हत्ती दिसतोय का? चॅलेंज पूर्ण करणारा ठरेल जीनिअस

'या' फोटोत तुम्हाला एक हत्ती दिसतोय का? चॅलेंज पूर्ण करणारा ठरेल जीनिअस

Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो दिसायला सामान्य असतात, पण या फोटोंमध्ये अशा गोष्टी लपलेल्या असतात ज्या सहजपणे डोळ्यांना दिसत नाहीत. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक हत्ती शोधायचा आहे. फोटोत हत्ती अगदी तुमच्या डोळ्यांसमोरच आहे, पण जास्तीत जास्त लोक या हत्तीला शोधण्यात फेल झाले आहेत.

तुमच्यासमोर जो फोटो आहे त्यात एक शिकारी तुम्हाला बंदूक घेऊन दिसत आहे आणि आजूबाजूला झाडीच झाडी आहेत. हा एका जंगलातील नजारा आहे. फोटोत बारकाईने बघितल्यावर इतरही काही शिकारी दिसतात. यातच एक हत्ती आहे. तुम्हाला दिसला का? नसेल तर दिसला तर तुम्हाला त्याला केवळ 5 सेकंदात शोधायचं आहे.

अशा ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये गोष्टी इतक्या हुशारीने लपवलेल्या असतात की, त्यांना शोधणं अवघड होतं. या फोटोतील हत्ती शोधण्यासाठी तुम्हाला फोटो फार बारकाईने बघावा लागेल आणि त्यासाठी जास्त डोकं लावावं लागेल. जर तुम्हाला यातील हत्ती दिसला असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर तुम्हाला अजूनही हत्ती दिसला नसेल तर निराश होऊ नका. आम्ही त्याला शोधण्यात तुमची मदत करू.

ज्या ज्या लोकांनी हे चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना खूप मेहनत करावी लागली. हत्तीला शोधण्याचं सगळ्यात सोपं काम म्हणजे तुमच्यासमोर असलेला फोटो उलटा करणं आहे. जेव्हा तुम्ही उलटा फोटो बघाल तेव्हा तुम्हाला लगेच हत्ती दिसेल.

 

Web Title: Optical Illusion : Can you spot hidden elephant in image eye vision games