Optical Illusion : या रंगीबेरंगी पोपटांमध्ये लपलं आहे एक फुलपाखरू, 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 15:28 IST2023-01-12T14:57:58+5:302023-01-12T15:28:05+5:30
Optical Illusion : या फोटोत तुम्हाला काही रंगीबेरंगी पोपट दिसत आहेत. त्यांच्यामधेच एक रंगीबेरंगी फुलपाखरू लपलं आहे. पण हे फुलपाखरू शोधण्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण नजर असायला हवी. तरच तुम्ही ते शोधू शकता.

Optical Illusion : या रंगीबेरंगी पोपटांमध्ये लपलं आहे एक फुलपाखरू, 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजनचे कित्येक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोंमध्ये एकतर तुम्हाला लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात नाही तर फोटोंमधील फरक शोधायचा असतो. आज असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला एक फुलपाखरू शोधायचं आहे. हे चॅलेंज तुम्हाला 10 सेकंदात पूर्ण करायचं आहे.
या फोटोत तुम्हाला काही रंगीबेरंगी पोपट दिसत आहेत. त्यांच्यामधेच एक रंगीबेरंगी फुलपाखरू लपलं आहे. पण हे फुलपाखरू शोधण्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण नजर असायला हवी. तरच तुम्ही ते शोधू शकता.
या फोटो फुलपाखरू इतक्या शिताफीनं लपवण्यात आलं आहे, जेणेकरून ते तुम्हाला सहज दिसू नये. पण सहज दिसलं तर त्यात काय मजा ना! फुलापखरू शोधण्यासाठी थोडी मेहनत तर घ्यावीच लागली पाहिजे ना. तुम्हाला तेच करायचं आहे. डोकं शांत ठेवून तुम्ही ते शोधाल तर नक्की 10 सेकंदात दिसेल.
बरं अनेक प्रयत्न करूनही तुम्हाला या फोटोतील फुलपाखरू दिसलं नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. ती म्हणजे यातील फुलपाखरू फोटोच्या डाव्या बाजूला आहे. आता इतकं सांगितल्यावर तर तुम्ही शोधूच शकता. नाही सापडलं तर खाली फोटोत बघा.