या फोटोत लपवलं आहे एक वेगळं पान? 7 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 15:31 IST2024-03-19T15:27:58+5:302024-03-19T15:31:52+5:30

Optical Illusion : या फोटोमध्ये झाडाची पाने दिसत आहेत. पण यात एक पान वेगळं आहे तेच तुम्हाला शोधायचं आहे.

Optical Illusion : Can you spot four leaf clover in this picture | या फोटोत लपवलं आहे एक वेगळं पान? 7 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

या फोटोत लपवलं आहे एक वेगळं पान? 7 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

Optical Illusion : सोशल मीडियावर तुम्ही नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो बघत असाल. हे फोटो बनवलेच असे जातात की, तुमच्या मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण होते. म्हणजे यात लपलेल्या किंवा लपवलेल्या गोष्टी तुम्हाला सहजपणे दिसत नाही. त्यामुळे या फोटोंबाबत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत उत्सुकता असते. यावेळीही आम्ही तुमच्यासाठी एक असाच फोटो घेऊन आलो आहोत. या फोटोमध्ये झाडाची पाने दिसत आहेत. पण यात एक पान वेगळं आहे तेच तुम्हाला शोधायचं आहे.

असे फोटो तुमच्या मनोरंजनासाठी आणि तुमच्या दृष्टीची व मेंदुची टेस्ट घेण्यासाठी तयार केले जातात. यात तुम्हाला जे शोधायचं असतं ते तुमच्या डोळ्यांसमोरच असतं. पण ते सहजपणे दिसत नाही. त्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे असायला हवेत. तेव्हाच तुम्ही यातील लपलेल्या गोष्टी शोधू शकता. यातील एक वेगळं पान लोकांना दिसत नाहीये. 

हा ऑप्टिकल इल्यूजन फोटो VSO कडून तयार करण्यात आला आहे. ज्यात बरीच पाने एकसारखी आहेत. यातील एक वेगळं पान शोधणं सोपं नाहीये. त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल आणि यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदाची वेळ आहे. 

आम्हाला आशा आहे की, तुम्ही या पानांमधील एक वेगळं पान शोधलं असेल. असं असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. जर तुम्हाला अजूनही यातील वेगळं पान सापडलं नसेल तर निराश होऊ नका. ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही उत्तर बघू शकता.

वेगळ्या पानाला सर्कल केलं आहे.

Web Title: Optical Illusion : Can you spot four leaf clover in this picture