चित्रात कुठे लपून बसलं आहे फुलपाखरू? 10 सेकंदात शोधून काढणारे ठरतील धुरंधर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 17:24 IST2026-02-04T17:23:55+5:302026-02-04T17:24:49+5:30
Optical Illusion : सोशल मीडियावर असे भ्रम निर्माण करणारे किंवा कन्फ्यूज करणारे कितीतरी फोटो व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो व्हायरल झालाय. ज्यात आपल्याला एक फुलपाखरू शोधायचंय.

चित्रात कुठे लपून बसलं आहे फुलपाखरू? 10 सेकंदात शोधून काढणारे ठरतील धुरंधर
Spot Butterfly Within 5 Seconds : बऱ्याचदा असं होतं की, आपल्या समोर असलेल्या गोष्टीच आपण बघू शकत नाही. अनेकदा काही ट्रिक वापरूनही डोळ्यांसमोर भ्रम निर्माण केला जातो. अशाच ट्रिकला ऑप्टिकल इल्यूजन म्हणतात. सोशल मीडियावर असे भ्रम निर्माण करणारे किंवा कन्फ्यूज करणारे कितीतरी फोटो व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो व्हायरल झालाय. ज्यात आपल्याला एक फुलपाखरू शोधायचंय.
आपल्यासमोर भ्रम निर्माण करणारी एक पेंटिंग आहे. बागेच्या या फोटोत वेगवेगळी झाडी आणि तलाव आहे. सोबतच यात एक फुलपाखरू सुद्धा लपलेलं आहे. ते आपल्या समोरच आहे. जे आपल्याला १० सेकंदात शोधायचं आहे. जर आपण चित्र बारकाईने बघितलं तर नक्कीच आपल्याला यातील फुलपाखरू १० सेकंदात दिसेल. जर आपण १० सेकंदात फुलपाखरू शोधलं तर आपले डोळे खरंच खूप तीक्ष्ण आहेत आणि मेंदू फोकस करण्यास तरबेज आहे.

ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो आपल्या मेंदू आणि डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर असतात. कारण यातील गोष्टी शोधताना मेंदू आणि डोळे दोन्हींची चांगली कसरत होते. इतकंच नाही तर या फोटोंच्या माध्यमातून आपली आयक्यू लेव्हल टेस्ट सुद्धा होते. एखाद्या गोष्टीवर फोकस करण्याची आपल्या मेंदूची क्षमता सुद्धा वाढते. त्यामुळेच असे फोटो सोशल मीडियावर शेअर करून लोक एकमेकांना यातील गोष्टी शोधण्याचं चॅलेंज देत असतात.

आपल्याला जर या फोटोतील फुलपाखरू दिसलं असेल तर आपलं अभिनंदन. आपले डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. आपली फोकस करण्याची क्षमता देखील चांगली आहे. जर अजूनही फुलपाखरू दिसलं नसेल तर निराश होऊ नका. पुन्हा एकदा त्याला शोधण्याचा प्रयत्न करा. तरीही दिसलं नाही तर आम्ही आपल्याला ते कुठे बसलं आहे हे दाखवतो. खालच्या फोटोत आपण त्याला बघू शकता.

वरच्या फोटोत फुलपाखरू सर्कल केलेलं आहे.