Optical Illusion : फोटोतील कपाटात लपून बसलीये एक मांजर, 15 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 14:34 IST2025-12-29T14:33:00+5:302025-12-29T14:34:05+5:30
Optical Illusion : एक वेगळा ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला लपून बसलेली एक मांजर शोधून काढायची आहे.

Optical Illusion : फोटोतील कपाटात लपून बसलीये एक मांजर, 15 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे असतात. त्यामुळेच ते सॉल्व्ह करणं किंवा त्यातील गोष्टी शोधणं लहानांसोबतच मोठ्यांना सुद्धा आवडतं. याच कारणाने सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. असे फोटो लोक शेअर करून त्यातील गोष्टी शोधण्याचं एकमेकांना चॅलेंज देत असतात. असाच एक वेगळा ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला लपून बसलेली एक मांजर शोधून काढायची आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमुळे लोकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण होते. या फोटोंच्या माध्यमातून लोकांचं चांगलं मनोरंजनही होतं आणि त्यांची डोळ्यांची व मेंदूची कसरतही होते. त्यामुळेच हे फोटो आरोग्यासाठी देखील चांगले मानले जातात. असा दावा करण्यात आला आहे की, केवळ 2 टक्के लोकच यातील मांजर शोधू शकले आहेत. हे ऑप्टिकल इल्यूजन आयक्यू टेस्ट करण्याची एक मजेदार पद्धत आहे. यातील मांजर शोधण्यासाठी आपल्याकडे 15 सेकंदाची वेळ आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी या फोटोंमध्ये आपल्याला वेगळे नंबर शोधायचे असतात, कधी काही वस्तू शोधायच्या असतात, कधी फरक शोधायचे असतात तर कधी लपून बसलेले प्राणी शोधायचे असतात. असाच हा आपल्या समोर असलेला फोटो आहे. ज्यात मांजर लपून बसली आहे. पण ती नेमकी कुठे आहे हेच शोधायचं आहे.

तुम्हाला अजूनही या फोटोत लपलेली मांजर दिसली नसेल तर आम्ही तुमच्या मदतीसाठी आहोत. या कपाटात तुम्हाला लटकलेले कपडे दिसतील. कपाटाच्या आत हॅंडबॅग, टोपी, शूज आणि सुटकेस दिसत असेल. हे ऑप्टिकल इल्यूजन तुमची नजर किती तीक्ष्ण आहे दाखवेल. अनेक प्रयत्न करूनही तुम्हाला यातील मांजर दिसली नसेल तर खालच्या फोटोत याचं उत्तर आहे.

वरच्या फोटोत यातील मांजर सर्कल केलेली आहे.