खतरनाक चॅलेंज! 7 सेकंदात कलिंगडाची वेगळी फोड शोधून दाखवा, मोठे जीनिअस लोकही झाले फेल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 15:14 IST2024-05-18T15:13:17+5:302024-05-18T15:14:19+5:30
Optical Illusion :या फोटोंमुळे मेंदुची आणि डोळयांची चांगली कसरत होते. सोबतच चांगला टाइमपासही होतो. हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे डोळ्यांसमोरच असलेल्या गोष्टी सहजपणे दिसत नाहीत. त्या तुम्हाला शोधाव्या लागतात.

खतरनाक चॅलेंज! 7 सेकंदात कलिंगडाची वेगळी फोड शोधून दाखवा, मोठे जीनिअस लोकही झाले फेल...
Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच अनेक आकर्षक गोष्टी व्हायरल होत असतात. त्यातील एक गोष्टी म्हणजे. ऑप्टिकल इल्यूजन फोटो. ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे नेहमीच लोकांना आवडणारे फोटो असतात. कारण या फोटोंमुळे मेंदुची आणि डोळयांची चांगली कसरत होते. सोबतच चांगला टाइमपासही होतो. हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे डोळ्यांसमोरच असलेल्या गोष्टी सहजपणे दिसत नाहीत. त्या तुम्हाला शोधाव्या लागतात.
ऑप्टिकल इल्यूजनचं एक भन्नाट चॅलेंज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यातील उत्तर शोधण्यात बरेजजण फेल झाले आहेत. तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला कापलेल्या कलिंगडाच्या काही फोडी दिसत आहेत. पण यात एक वेगळी फोड आहे. जी तुम्हाला शोधायची आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदाची वेळ आहे.
महत्वाची बाब म्हणजे हे चॅलेंज तुम्हाला 7 सेकंदात पूर्ण करायचं आहे. चॅलेंज तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही. कारण वेगळी फोड शोधण्यासाठी तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. प्रयत्न केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
जर तुम्हाला 7 सेकंदात या फोटोतील कलिंगडाची कापलेली वेगळी फोड दिसली असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही सापडली नसेल तर काही चिंता नाही. निराश होऊ नका. ती शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही उत्तर बघू शकता.