कॅफेच्या या फोटोत पतंग शोधण्याचं आहे चॅलेंज, ७ सेकंदाची आहे वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 13:20 IST2024-06-10T13:18:35+5:302024-06-10T13:20:51+5:30
Optical Illusion: आज आम्ही तुमच्यासाठी असंच एक ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंज घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक पतंग शोधायची आहे.

कॅफेच्या या फोटोत पतंग शोधण्याचं आहे चॅलेंज, ७ सेकंदाची आहे वेळ!
Optical Illusion: आजकाल धावपळीच्या जीवनात आणि वाढलेल्या कामाच्या ताणामुळे लोकांना मानसिक थकवा खूप जाणवतो. अशात मेंदुची कसरत करणारे ऑप्टिकल इल्यूजनसारखे चॅलेंज फारच फेमस असतात. आज आम्ही तुमच्यासाठी असंच एक ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंज घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक पतंग शोधायची आहे.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला एक कॅफे दिसत आहे. यात काही लोक कॅफेमध्ये मेन्यू बघत आहेत तर काही लोक काउंटरवर ऑर्डर देण्यासाठी उभे आहेत. यातच तुम्हाला एक पतंग शोधायची आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. यात असलेल्या गोष्टी सहजपणे दिसत नाही. त्या शोधाव्या लागतात. पण हे काही सोपं काम नसतं. यातील गोष्टी शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते आणि हुशारीही दाखवावी लागते. आता या फोटोत तुम्हाला ७ सेकंदात एक पतंग शोधायची आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोच्या माध्यमातून तुमचं चांगलं मनोरंजन होतं आणि सोबतच मेंदू आणि डोळ्यांची कसरतही होते. म्हणून लहान मुलांसोबत मोठ्यांनाही हे फोटो सॉल्व करणं आवडतं. कधी या फोटोंमध्ये काही गोष्टी शोधायच्या असतात तर कधी या फोटोंमध्ये फरक शोधायचे असतात.
तुम्हाला जर ७ सेकंदात या फोटोतील पतंग दिसली असेल तर तुम्ही जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील पतंग सापडली नसेल तर निराश होण्याचं कारण नाही. ती शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत ती तुम्ही बघू शकता.