Optical illusion : या फोटोतील पेन्सिल शोधणं आहे मोठं चॅलेन्ज, भलेभले शोधून थकले, तुम्हीही शोधा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 12:54 IST2022-09-26T12:51:23+5:302022-09-26T12:54:48+5:30

Optical Illusion : एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात तुम्हाला खूपसारे पुस्तकं दिसतील, त्यात तुम्हाला एक वस्तू शोधायची आहे.

Optical illusion : Can you find hidden pencil in this picture hard riddles quiz | Optical illusion : या फोटोतील पेन्सिल शोधणं आहे मोठं चॅलेन्ज, भलेभले शोधून थकले, तुम्हीही शोधा!

Optical illusion : या फोटोतील पेन्सिल शोधणं आहे मोठं चॅलेन्ज, भलेभले शोधून थकले, तुम्हीही शोधा!

Optical Illusion : सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. हे ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच मेंदूला कन्फ्यूज करत असतात. कारण त्यात दिसतं ते कधीच नसतं. त्यांमध्ये काहीतरी रहस्य किंवा काहीतरी दडलेलं असतं. लोकांनाही या फोटोतील रहस्य सॉल्व करण्यात मजा येते. त्यामुळेच हे फोटो व्हायल होत असतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात तुम्हाला खूपसारे पुस्तकं दिसतील, त्यात तुम्हाला एक वस्तू शोधायची आहे.

या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तुम्हाला अनेक पुस्तकं दिसत आहेत. त्यांचा रंग निळा, हिरवा आणि लाल आहे. या फोटोकडे बारकाईने बघितलं तर तुम्हाला यात पुस्तकांशिवाय काहीच दिसत नाही. पण या फोटोमधील पुस्तकांमध्ये गठ्ठ्यात एक पेन्सिल लपली आहे. पण ती पहिल्यांदा ती दिसणार नाही. त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. 

या फोटोत पेन्सिल शोधण्यासाठी डोळ्यांवर फार जोर द्यावा लागणार आहे. अनेक लोकांनी यातील पेन्सिल शोधण्याचं काम केलं, पण ते यात फेल झाले. अनेक लोक तर म्हणाले की, या फोटोत पेन्सिल नाहीच. पण यात खरंच पेन्सिल आहे. तुम्हाला यात हिरव्या रंगाची पेन्सिल दिसेल. जी पुस्तकांमध्ये दबली आहे. 

Web Title: Optical illusion : Can you find hidden pencil in this picture hard riddles quiz