केवळ 10 सेकंदात शोधायच्या आहेत वृद्ध व्यक्तीच्या 3 मुली, जीनिअस असाल तरच शोधाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 12:57 IST2023-09-27T12:53:30+5:302023-09-27T12:57:01+5:30

Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. यातील काहींमध्ये तुम्हाला लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर कधी चुका शोधायच्या असतात.

Optical illusion : Can you find and show three daughters of this old man in just 10 seconds | केवळ 10 सेकंदात शोधायच्या आहेत वृद्ध व्यक्तीच्या 3 मुली, जीनिअस असाल तरच शोधाल!

केवळ 10 सेकंदात शोधायच्या आहेत वृद्ध व्यक्तीच्या 3 मुली, जीनिअस असाल तरच शोधाल!

Optical Illusion: ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. असाच एक तुम्हाला  कन्फ्यूज करणारा फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ऑप्टिकल इल्यूजन असलेल्या या फोटोमध्ये तुम्हाला एक म्हातारी व्यक्ती दिसत आहे. ज्याला तीन मुलीही आहेत. ज्या फोटोत लपवलेल्या आहेत. तुम्हाला केवळ 10 सेकंदात त्याच्या या तीन मुली शोधायच्या आहेत. 

सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. यातील काहींमध्ये तुम्हाला लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर कधी चुका शोधायच्या असतात. असाच हा फोटो आहे. यात तुम्हाला तीन मुली शोधायच्या आहेत. पण त्यासाठी तुमच्याकडे फार तीक्ष्ण डोळे हवेत. तरच ते शक्य होईल. या फोटोत तुम्हाला जे दिसत आहे ते तसं नाहीये. पण यातील गोष्टी शोधता शोधता तुमचं ऑब्जर्वेशन स्किल वाढतं.

जसं की, वर सांगितलं या फोटोत तुम्हाला एक वृद्ध व्यक्ती दिसत आहे, त्याच्यासोबत फोटोत त्याच्या तीन मुलीही आहेत. पण त्यांना शोधणं काही सोपं काम नाही. त्यामुळेच तुम्हाला त्यांना शोधण्यासाठी 10 सेकंदाची वेळ दिली आहे. जर तुम्ही 10 सेकंदात यातील तीन मुली शोधू शकले असाल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही यातील मुली दिसल्या नसतील तर निराश होऊ नका. आम्ही त्याना शोधण्यात तुमची मदत करतो. खालच्या फोटोत तुम्ही वृद्ध व्यक्तीच्या तीन मुली बघू शकता.

Web Title: Optical illusion : Can you find and show three daughters of this old man in just 10 seconds