फक्त 1 टक्के लोकच शोधू शकले 'n' च्या गर्दीतील सगळी 'm' अक्षरे, आपणही ट्राय करा आणि जीनिअस ठरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 17:04 IST2026-03-13T17:03:01+5:302026-03-13T17:04:17+5:30

Optical Illusion Challenge : अशा प्रकारच्या कोडी नियमित सोडवल्यास मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि वयोमानानुसार होणारी मानसिक क्षमता कमी होण्याची शक्यता कमी होते.

Optical Illusion: Can You Find All the “m”s Among “n”s in 11 Seconds In This Picture | फक्त 1 टक्के लोकच शोधू शकले 'n' च्या गर्दीतील सगळी 'm' अक्षरे, आपणही ट्राय करा आणि जीनिअस ठरा!

फक्त 1 टक्के लोकच शोधू शकले 'n' च्या गर्दीतील सगळी 'm' अक्षरे, आपणही ट्राय करा आणि जीनिअस ठरा!

Optical Illusion Challenge : ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे अशा प्रकारच्या चित्रांमुळे आपल्या मेंदूची आणि डोळ्यांची समज थोडी गोंधळात पडते. म्हणजेच काय तर मेंदू जरा कन्फ्यूज होतो. कारण समोरच्या चित्रात जे शोधायचं असतं ते त्याला सहजपणे दिसत नाही. ऑप्टिकल इल्यूजन सॉल्व्ह करण मजेदारच नसतं, तर ते मानसिक आरोग्य सुधारण्यासही मदत करतं. अशा प्रकारच्या कोडी नियमित सोडवल्यास मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि वयोमानानुसार होणारी मानसिक क्षमता कमी होण्याची शक्यता कमी होते. असंच एक ऑप्टिकल इल्यूजन आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे.

आता तुमच्या डोळ्यांची तीक्ष्णता तपासायला तयार आहात का? असाल तर मग खाली दिलेल्या चॅलेंजकडे लक्ष द्या. या ऑप्टिकल इल्यूजन चित्रामध्ये “n” अक्षरांच्या गर्दीमध्ये लपलेली सर्व “m” अक्षरे आपल्याला केवळ 11 सेकंदांत शोधायची आहेत. असे म्हणतात की चांगली निरीक्षण क्षमता असलेल्या फक्त 1% लोकांनाच ही सर्व “m” अक्षरे 11 सेकंदांत सापडतात.

तुम्ही त्या 1% लोकांमध्ये आहात का? आत्ताच शोधून काढा! वरील मेंदूला गोंधळात टाकणाऱ्या या ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंजमध्ये आपल्याला “n” अक्षरांच्या जाळ्यामध्ये लपलेली सर्व “m” अक्षरे 11 सेकंदांत शोधायची आहेत. चला तर मग फोटो बारकाईने बघा आणि यातील m अक्षरे शोधून दाखवा.

ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंजेसची सगळ्यात चांगली खासियत ही असते की, यातून मनोरंजन तर होतंच, सोबतच मेंदू आणि डोळ्यांचा व्यायाम देखील होता. कारण समोरच्या फोटो बारकाईने लक्ष देऊन पाहिल्याशिवाय आपण त्यातील गोष्ट शोधू शकत नाहीत. त्यात हा फोटो जरा जास्तच अवघड आहे. त्यामुळे आपल्याला मेहनत अधिक घ्यावी लागेल. 

जर आपल्याला ठरलेल्या वेळेत म्हणजेच 11 सेकंदात यातील m अक्षरे दिसली असतील तर आपलं अभिनंदन. खरंच आपली नजर खूप तीक्ष्ण आहे. पण अजूनही दिसले नसतील तर अधिक मेहनत घ्यावी लागेल. आपल्याला यश नक्कीच मिळू शकेल. पण जर बरीच मेहनत घेऊनही सगळी अक्षरे दिसली नसतील तर निराशही होऊ नका. कारण ती किती आणि कुठे आहेत हे आपल्याला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत ते बघू शकता. 

वरच्या फोटोत सगळी अक्षरे सर्कल केलेली आहेत. 

Web Title : सिर्फ 1% लोग ही 'n' में 'm' ढूंढ सकते हैं: क्या आप कर सकते हैं?

Web Summary : ऑप्टिकल भ्रम धारणा को चुनौती देते हैं, जिससे दिमागी शक्ति बढ़ती है। जीनियस साबित करने के लिए 11 सेकंड में 'n' के भीतर छिपे सभी 'm' ढूंढें।

Web Title : Only 1% can find 'm's in 'n's: Can you?

Web Summary : Optical illusions challenge perception, boosting brainpower. Find all 'm's hidden within 'n's in 11 seconds to prove genius.