चॅलेंज! उपाशी बिबट्या जेवणाची वाट बघत दगडात लपून बसलाय, 13 सेकंदात शोधून दाखवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 14:32 IST2025-12-27T14:18:10+5:302025-12-27T14:32:54+5:30
Optical Illusion : सध्या राज्यात गावोगावी बिबटे फिरत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशात या फोटोतील बिबट्या आपण शोधू शकता का हे एकदा नक्की ट्राय करा.

चॅलेंज! उपाशी बिबट्या जेवणाची वाट बघत दगडात लपून बसलाय, 13 सेकंदात शोधून दाखवा!
Optical Illusion Find A Hidden Leopard: ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमधील गोष्टी शोधणं आता काही नवीन राहिलेलं नाही. रोज शेकडो फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातात. जे बघून लोक त्यातील गोष्टी शोधतात. काहींना यश मिळतं तर काहींना नाही. पण यात एक वेगळीच मजा येते. टाइमपास तर चांगला होतोच, सोबतच मेंदू आणि डोळ्यांचा व्यायामही होतो. असाच एक जुना पण फारच इंटरेस्टींग असा ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला एक बिबट्या शोधायचा आहे. सध्या राज्यात गावोगावी बिबटे फिरत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशात या फोटोतील बिबट्या आपण शोधू शकता का हे एकदा नक्की ट्राय करा.
तसा हा ऑप्टिकल इल्यूजन फोटो काही नवीन नाही. हा फोटो भारतीय वाइल्ड लाइफ फोटोग्राफर हिरा पंजाबीने काही वर्षांआधी काढला होतो. त्यांनी हा फोटो काढणं त्यांच्या आतापर्यंत सर्वात भारी अनुभवांपैकी एक असल्याचं सांगितलं आहे. आपण फोटोत बर्फाने झाकलेला एक डोंगर बघू शकता. इथे एक शिकारीही आहे. जो बर्फाळ डोंगरात आपल्या शिकारची वाट बघत आहे. तुमच्यासाठी चॅलेंज हे आहे की, तुम्हाला यातील बिबट्या 13 सेकंदात शोधायचा आहे. स्नो लेपर्ड हा फारच हुशार असतो, आपल्या शिकारीला दिसू नये म्हणून तो बर्फात लपतो.

या फोटोत तसं बिबट्याला शोधणं फारच अवघड काम आहे. पण तो शोधण्यासाठी तुम्हाला फोटो बारकाईने बघावा लागेल आणि त्यातील बिबट्या शोधावा लागेल. तो डोंगराच्या आसपास लपला आहे, त्यामुळे तो पकटन दिसत नाही. पण ज्यांनी नजर तीक्ष्ण आहे ते नक्कीच यातील बिबट्याला शोधू शकतात.

आपल्याला जर १३ सेकंदात यातील बिबट्या दिसला असेल तर खरंच आपले डोळे खूपच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही दिसला नसेल तर निराश होऊ नका. तो कुठे लपून बसलाय हे आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. तुम्हाला जर खूप प्रयत्न करूनही यातील बिबट्या दिसला नसेल तर खालच्या फोटोत तुम्ही तो बघू शकता.

वरच्या फोटोत बिबट्या कुठे लपलाय हे सर्कल करून दाखवलं आहे.