आबरा का डाबरा! 'या' फोटोत 29 सोबत आहे एक वेगळाही नंबर, जो 5 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 14:41 IST2025-12-23T14:36:45+5:302025-12-23T14:41:20+5:30

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो तसेच आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे यांमध्ये जे असतं ते सहज दिसत नाही, कन्फ्यूजन व्हायला होतं. म्हणून जे आहे ते शोधण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते.

Optical illusion : Can you find 99 among 29 in 5 second, can you solve the puzzle | आबरा का डाबरा! 'या' फोटोत 29 सोबत आहे एक वेगळाही नंबर, जो 5 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज

आबरा का डाबरा! 'या' फोटोत 29 सोबत आहे एक वेगळाही नंबर, जो 5 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज

Optical Illusion: सोशल मीडियावर बरेच लोक व्हिडीओ, रील किंवा वायफळ पोस्ट बघत असतात असं अजिबात नाही. बरेच लोक असे असतात, जे सोशल मीडियावर मानसिक आरोग्य सुधारेल, फोकस वाढेल अशा गोष्टीही बघत असतात. असे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे आपल्या मेंदूची कसरत करतात आणि डोळ्यांची सुद्धा कसरत करतात. अशा फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हणतात. इल्यूजन म्हणजेच भ्रम. हे फोटो तसेच आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे यांमध्ये जे असतं ते सहज दिसत नाही, कन्फ्यूजन व्हायला होतं. म्हणून जे आहे ते शोधण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. असाच एक फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.

आपल्या समोर जो फोटो आहे, त्यात आपल्याला सगळीकडे 29 हा नंबर दिसत आहे. पण याच 29 नंबरच्या गर्दीत एक वेगळी नंबर लपवण्यात आला आहे. तो म्हणजे 99. पहिल्यांदा आपण फोटो बघाल तर सगळीकडे फक्त 29 हा नंबर दिसले. पण जर बारकाईने बघाल तर 99 नंबरही दिसेल. तोच आपल्याला शोधायचा आहे. पण हा नंबर आपल्याला केवळ 5 सेकंदात शोधायचा आहे. तेव्हाच या खेळाची खरी मजा येईल.

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. काहींमध्ये काही वस्तू, प्राणी, व्यक्ती शोधायचे असतात, तर काहींमध्ये एकसारख्या दिसणाऱ्या फोटोत फरक शोधायचे असतात. पण या फोटोत आपल्याला वेगळा नंबर शोधायचा आहे. हा नंबर शोधण्यासाठी आपल्याला मेंदू आणि डोळ्यांना परस्पर पद्धतीने चालवायचं आहे. तसा हा फोटो दिसतो फारच सोपा, पण तेवढाही सोपा नाही. कारण आपल्याकडे केवळ 5 सेकंदाची वेळ आहे. या वेळेतच आपल्याला नंबर शोधायचा आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोतील वेगळा नंबर शोधण्यासाठी आपल्याला जी वेळ देण्यात आली होती, ती संपली आहे. आम्हाला आशा आहे की, या वेळेत आपण फोटोतील 99 हा नंबर शोधला असेलच. शोधला असेल तर आपलं अभिनंदन. पण जर अजूनही दिसला नसेल तर निराश होऊ नका. कारण तो कुठे आहे हे आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत आपण 99 हा नंबर बघू शकता.

वरच्या फोटोत वेगळा नंबर सर्कल केलेला आहे.

Web Title : ऑप्टिकल इल्यूजन: 5 सेकंड में 29 के बीच छिपा 99 ढूंढें!

Web Summary : ऑप्टिकल इल्यूजन दिमाग और आँखों को चुनौती देते हैं। इस तस्वीर में 29 के समुद्र में 99 छिपा है। क्या आप इसे 5 सेकंड में ढूंढ सकते हैं? उत्तर अंत में दिखाया गया है।

Web Title : Optical Illusion: Find the Hidden Number 99 in 5 Seconds!

Web Summary : Optical illusions challenge the brain and eyes. This photo hides the number 99 within a sea of 29s. Can you spot it in 5 seconds? The answer is revealed at the end.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.