चॅलेंज! 15 सेकंदात शोधा फोटोतील 777 हा वेगळा नंबर, ठराल जीनिअस1
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:40 IST2025-06-12T15:38:13+5:302025-06-12T15:40:05+5:30
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे असतात. म्हणजे यातील गोष्टी तुम्हाला सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधाव्या लागतात.

चॅलेंज! 15 सेकंदात शोधा फोटोतील 777 हा वेगळा नंबर, ठराल जीनिअस1
Optical Illusion : सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स खेळायला मिळतात. जे खेळून मेंदुला फ्रेश वाटतं आणि सोबतच मनोरंजनही होतं. ऑप्टिकल इल्यूजन फोटो याचाच एक भाग असतात. या फोटोंमध्ये लपलेल्या किंवा लपवलेल्या गोष्टी शोधायच्या असतात. ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे असतात. म्हणजे यातील गोष्टी तुम्हाला सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधाव्या लागतात. ज्यामुळे डोळे आणि मेंदुची चांगली कसरत होते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. यात फोटोत तुम्हाला सगळीकडे 77R असा नंबर दिसत आहे. पण यात एके ठिकाणी 777 शोधायचा आहे. पण हा नंबर शोधण्यासाठी तुमच्याकडे १५ सेकंदाचीच वेळ आहे.
पहिल्यांदा फोटो पाहिल्यावर असं वाटतं की, हा एक साधारण फोटो आहे. पण असं अजिबात नसतं. हे फोटो अशा पद्धतीनं डिझाइन केले जातात की, त्यातील गोष्टी सहजपणे दिसू नये. त्या शोधण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. बरेच लोक असे फोटो सोशल मीडियावर शेअर करत एकमेकांना चॅलेंज देत असतात.
जर तुम्हाला या फोटोतील 777 नंबर १५ सेकंदात दिसला असेल तर तुमचं अभिनंदन. तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत आणि तुम्ही जीनिअस आहात. पण जर अजूनही दिसला नसेल तर निराशही होऊ नका. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही हा नंबर बघू शकता.
वरच्या फोटोत 777 नंबर पिवळ्या रंगाच्या सर्कलमध्ये बघू शकता.