ना ३, ना २ 'या' फोटोत आहेत तब्बल ५ फरक; १५ सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 13:29 IST2024-08-09T13:22:26+5:302024-08-09T13:29:20+5:30
Optical illusion : एक चॅलेंज आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला ५ फरक शोधायचे आहेत.

ना ३, ना २ 'या' फोटोत आहेत तब्बल ५ फरक; १५ सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
Optical illusion : डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे फोटो म्हणजे ऑप्टिकल इल्यूजन फोटो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळयांनाच आवडतात. या फोटोंच्या माध्यमातून चांगलं मनोरंजन तर होतंच सोबतच मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. त्यामुळे मानसोपचारतज्ज्ञ देखील असे फोटो बघण्याचा आणि त्यातील गोष्टी सॉल्व करण्याचा सल्ला देत असतात. असाच एका फोटो आज आम्ही घेऊन आलो आहोत.
बरेच लोक असे फोटो सोशल मीडियावर शेअर करून एकमेकांना चॅलेंज देत असतात. असंच एक चॅलेंज आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला ५ फरक शोधायचे आहेत. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ १५ सेकंदाची वेळ आहे.
या फोटोमध्ये २ घरं दाखवण्यात आली आहेत. या फोटोंमधील दोन्ही घरांचं डिझाइन एकसारखं दिसत आहे. पण जेव्हा तुम्ही फोटो बारकाईने बघाल तेव्हा तुम्हाला यातील फरक दिसून येतील. एकसारख्या दिसणाऱ्या या फोटोंमध्ये ५ फरक आहेत. जे तुम्हाला शोधायचे आहेत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी या फोटोंमध्ये तुम्हाला प्राणी किंवा वस्तू शोधायच्या असतात तर कधी यात वेगळे नंबर शोधायचे असतात. तर कधी यात फरक शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे ज्यात तुम्हाला फरक शोधायचे आहेत.
जर तुम्हाला ठरलेल्या वेळेत म्हणजे १५ सेकंदात फोटोतील ५ फरक दिसले असतील तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. जर अजूनही दिसले नसतील निराशही होऊ नका. कारण यात पाच फरक काय आहेत हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. फोटोतील पाच फरक तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता.
एकसारख्या दिसणाऱ्या फोटोतील ५ फरक सर्कल केलेले आहेत.