वृद्ध व्यक्तीच्या 'या' दोन एकसारख्या फोटोत आहेत ३ फरक, फक्त १५ सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 16:34 IST2026-01-30T16:10:25+5:302026-01-30T16:34:22+5:30
Optical Illusion : स्पॉट द डिफरन्स कोड्याची संकल्पना सोपी आहे. समोर दोन जवळपास एकसारखी दिसणारी चित्रे दिली जातात आणि त्यामधील सूक्ष्म फरक ओळखणे हे तुमचं काम असतं.

वृद्ध व्यक्तीच्या 'या' दोन एकसारख्या फोटोत आहेत ३ फरक, फक्त १५ सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
Optical Illusion : स्पॉट द डिफरन्स म्हणजे एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोत फरक शोधण्याची ही कोडी एखाद्या व्यक्तीची निरीक्षणशक्ती आणि स्मरणशक्ती तपासण्यासाठी फारच फायदेशीर मानली जाते. आजच्या काळात ही पझल्स आव्हानं ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर खूपच लोकप्रिय आहे. हा खेळ खेळताना केवळ मजाच मिळत नाही, तर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते आणि एकाग्रता सुधारण्यासही मदत होते.
स्पॉट द डिफरन्स कोड्याची संकल्पना सोपी आहे. समोर दोन जवळपास एकसारखी दिसणारी चित्रे दिली जातात आणि त्यामधील सूक्ष्म फरक ओळखणे हे तुमचं काम असतं. मेंदू आणि डोळे एकाच वेळी सक्रिय होत असल्याने हा खेळ मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. त्यामुळे लक्ष, एकाग्रता आणि निरीक्षणक्षमता अधिक मजबूत होते. असाच एक फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला तीन फरक शोधायचे आहेत. तेही १५ सेकंदात.

वेळेची मर्यादा ठेवल्याने या खेळातील आव्हान आणखी वाढते आणि तो नेटिझन्समध्ये अधिक आकर्षक ठरतो. तुम्हाला मजा देणारा आणि तुमची निरीक्षणशक्ती व सतर्कता दाखवण्याची संधी देणारा खेळ हवा असेल, तर हा खेळ तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.

आता आपल्यासमोर असलेल्या फोटोत आपल्याला एक वयस्कर व्यक्ती पेपर वाचताना आणि चहा पिताना दिसत आहे. पहिल्या नजरेला ही दोन्ही चित्रे अगदी एकसारखी वाटतात. मात्र प्रत्यक्षात त्यामध्ये तीन फरक आहेत. हे फरक तुम्हाला १५ सेकंदांत ओळखायचे आहेत.

अशा प्रकारच्या कोडी सोडवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे चित्राकडे पूर्ण लक्ष देऊन पाहणे आणि दोन्ही चित्रांमधील वस्तूंची स्थिती, रंग आणि आकार यांसारख्या सूक्ष्म तपशीलांचा बारकाईने अभ्यास करणे.

जर आपल्याला यातील तीन फरक १५ सेकंदात दिसले असतील तर आपलं अभिनंदन पण अजूनही दिसले नसतील तर निराश होऊ नका. कारण यात तीन फरक काय आहेत हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत. खालच्या फोटोत यातील तीन फरक बघू शकता.

वरच्या फोटोत ३ फरक सर्कल केले आहेत.