Optical Illusion : फोटोत आहेत एकापेक्षा जास्त पुस्तके, किती आणि कुठे आहेत? शोधता शोधता नाकी येतील नऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 16:17 IST2026-02-06T16:15:22+5:302026-02-06T16:17:27+5:30

Optical Illusion: जेव्हा आपण यातील सगळी पुस्तकं शोधू लागतो तेव्हा मात्र नाकी नऊ येतात. जर आपल्याकडे तीक्ष्ण नजर असेल तर नक्कीच यातील पुस्तकं लगेच शोधू शकाल.

Optical illusion : Can find the hidden books in the picture in 10 second | Optical Illusion : फोटोत आहेत एकापेक्षा जास्त पुस्तके, किती आणि कुठे आहेत? शोधता शोधता नाकी येतील नऊ

Optical Illusion : फोटोत आहेत एकापेक्षा जास्त पुस्तके, किती आणि कुठे आहेत? शोधता शोधता नाकी येतील नऊ

Optical Illusion: सोशल मीडियावर सध्या एका ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंजची जोरदार चर्चा सुरू आहे. या चॅलेंजने अनेकांना हैराण करून सोडलंय. रेडिटवर व्हायरल झालेल्या एका फोटोत लपवण्यात आलेली सगळी पुस्तकं शोधण्यास सांगण्यात आलं आहे. पहिल्या नजरेत तर हे काम फारच सोपं वाटतं. पण जेव्हा आपण यातील सगळी पुस्तकं शोधू लागतो तेव्हा मात्र नाकी नऊ येतात. जर आपल्याकडे तीक्ष्ण नजर असेल तर नक्कीच यातील पुस्तकं लगेच शोधू शकाल.

रेडिटवर व्हायरल झाला फोटो

हा ऑप्टिकल इल्यूजन फोटो रेडिटवर r/brainteaser ग्रुपवर maria_Sayo_8591 नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हायरल ऑप्टिकल इल्यूजन पेंटिंगमध्ये लपवण्यात आलेली सगळी पुस्तकं शोधायचं चॅलेंज दिलं गेलं आहे. यातील मुख्य आव्हान हे आहे की, फोटोतील पुस्तकं शोधण्यासाठी केवळ १० सेकंदाची वेळ देण्यात आली आहे.

या ऑप्टिकल इल्यूजन फोटोतील पुस्तकं शोधण्यासाठी मन शांत आणि एकाग्र असायला हवं. कारण चित्रातील सगळ्याच गोष्टींकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज असते. जोपर्यंत आपल्याला पुस्तकं सापडत नाहीत, तोपर्यंत काही हार मानू नका. एक महत्वाची बाब म्हणजे अशाप्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन फोटो रोज सॉल्व्ह केल्याने मेंदू आणि डोळ्यांचा चांगला व्यायाम होतो. सोबतच याने एकाग्रता आणि फोकसही वाढतो.

जर आपल्याला चित्रातील सगळी पुस्तकं शोधायला अडचण येत असेल तर आम्ही मार्ग थोडा सोपा करून देतो. फोटोत एकूण पाच पुस्तकं आहेत. यातील काही पुस्तकं सहजपणे डोळ्यांना दिसतात. पण एक - दोन पुस्तकं बॅगग्राउंडला अशी लपवण्यात आली आहे की, ती सहजपणे दिसत नाहीत. त्यासाठी जरा जास्त मेहनत घ्यावी लागेल. खाली दिलेल्या फोटोत आपण सगळी पुस्तकं बघू शकता.

वरच्या फोटोत चित्रातील सगळी पुस्तकं सर्कल केले आहेत.

Web Title : ऑप्टिकल इल्यूजन: छिपी हुई किताबें ढूंढें; एक कठिन दृश्य चुनौती!

Web Summary : एक वायरल ऑप्टिकल इल्यूजन में दर्शकों को एक तस्वीर में छिपी हुई किताबें ढूंढने की चुनौती दी गई है। कई लोगों को दिए गए 10 सेकंड के भीतर सभी किताबों को ढूंढना मुश्किल लगता है। इन पहेलियों को नियमित रूप से हल करने से दिमाग तेज होता है, एकाग्रता में सुधार होता है और फोकस बढ़ता है।

Web Title : Optical Illusion: Find hidden books; a tough visual challenge!

Web Summary : A viral optical illusion challenges viewers to find hidden books in a picture. Many find it difficult to spot all the books within the given 10 seconds. Solving these puzzles regularly sharpens the brain, improves concentration, and enhances focus.