Optical Illusion: झाडांमध्ये लपला आहे एक कोल्हा, केवळ 11 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 10:00 IST2022-12-09T09:58:33+5:302022-12-09T10:00:39+5:30
Optical Illusion : आज आम्ही असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जे डोकं चक्रावून सोडणारं आहे. यात तुम्हाला एक कोल्हा शोधायचा आहे.

Optical Illusion: झाडांमध्ये लपला आहे एक कोल्हा, केवळ 11 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज
Optical Illusion Find A Wolf: सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो व्हायरल होत असतात. त्यात कधी एखादी वस्तू शोधायची असते तर कधी एखादा प्राणी शोधायचा असतो. जास्तीत जास्त ऑप्टिकल इल्यूजन प्राण्यांना शोधण्याचेच असतात. कारण ते इंटरेस्टिंग असतात. लोकांनाही प्राणी शोधण्याचे ऑप्टिकल इल्यूजन जास्त आवडतात. आज आम्ही असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जे डोकं चक्रावून सोडणारं आहे. यात तुम्हाला एक कोल्हा शोधायचा आहे.
हा फोटो अमेरिकन वाइल्डलाइफ फोटोग्राफर आर्ट वोल्फ यांनी काढलेला आहे. यात तुम्हाला एक जंगल दिसत आहे. ज्यात भरपूर झाडी आहेत आणि गवत आहे. आता या फोटोत तुम्हाला 11 सेकंदात एक कोल्हा शोधायचा आहे.
याप्रकारच्या ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंजेसने तुमचं ऑब्जर्वेशन स्किल वाढवण्यास मदत मिळते. कोल्हा एक चतुर प्राणी आहे. तो पहिल्या नजरेत दिसून येणार नाही. त्यामुळे या कोल्ह्याला शोधण्यासाठी तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागणार आहे.
या फोटोतील कोल्हा शोधण्यासाठी तुम्हाला आधी फोटो चांगल्याप्रकारे बघावा लागेल आणि कोल्ह्यासारखी दिसणारी आकृती बघा. तुमचं ऑब्जर्वेशन स्किल टेस्ट करण्याची ही जबरदस्त पद्धत आहे. जर तुम्हाला अजूनही कोल्हा दिसला नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. ज्याद्वारे तुम्ही कोल्ह्याला सहज शोधू शकाल. कोल्हा एका झाडामागून डोकावत आहे. जर अजूनही तुम्हाला कोल्हा दिसला नसेल तर खाली उत्तर दिलं आहे.