Optical Illusion: या फोटोत लपला आहे एक जिराफ, नजर तीक्ष्ण असेल तर शोधून दाखवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 14:43 IST2022-08-05T14:41:28+5:302022-08-05T14:43:19+5:30
Optical Illusion : पहिल्यांदा पाहिल्यावर तुम्हाला चारही बाजूने झाडी आणि गवत दिसतं. त्यामुळे यामधे जिराफाला शोधणं अवघड होतं. पण काही लोकांनी जिराफ काही सेकंदातच शोधला.

Optical Illusion: या फोटोत लपला आहे एक जिराफ, नजर तीक्ष्ण असेल तर शोधून दाखवा!
Optical Illusion Find The Giraffe: अलिकडे सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजन असलेले अनेक फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होत असतात. लोक हे फोटो बघून स्वत:च्या नजरेची आणि मेंदूची टेस्ट करतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला असून या फोटो सर्वांनाच हैराण केलं आहे. या फोटोत एक जिराफ लपला आहे. ज्याला शोधता शोधता अनेकांच्या नाही नऊ आले आहेत. पहिल्यांदा पाहिल्यावर तुम्हाला चारही बाजूने झाडी आणि गवत दिसतं. त्यामुळे यामधे जिराफाला शोधणं अवघड होतं. पण काही लोकांनी जिराफ काही सेकंदातच शोधला.
आम्ही तुम्हाला एक क्लू देतो. ज्यानुसार जिराफ एका झाडाखाली उभा आहे. जिराफाच्या मानेची लांबी एका झाडापेक्षा जास्त असते. यावरून तुम्ही या फोटोत लपलेला जिराफ सहजपणे शोधू शकता. इतकं सांगूनही काही लोकांना या फोटोतील जिराफ दिसू शकला नसेल तर आणखी एक संकेत आम्ही तुम्हाला देतो. यूजर फोटोच्या एका कोपऱ्यात जिराफला शोधू शकतात. झाडाच्या मिळत्या जुळ्यात रंगामुळे जिराफ यात लगेच दिसत नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ऑप्टिकल इल्यूजन फोटोमधील रहस्य शोधणं सहजपणे शक्य नाही. यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण नजर असली पाहिजे. इतकंच नाही तर तुम्हाला डोकंही शांत ठेवून त्याचा शोध घ्यावा लागेल. जिराफ शोधण्यासाठी तुम्हाला समोरच नाही तर आजूबाजूला बघावं लागेल. काही लोक आधीच निराश होऊन फोटोतील रहस्य शोधू लागतात. पण योग्यपणे मन शांत ठेवून जर शोध घ्याल तर तुम्हाला जिराफ लगेच दिसेल.