Optical Illusion: पेंटिंगमध्ये लपले आहेत ६ प्राणी, तुमची नजर तीक्ष्ण असेल तर शोधून दाखवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 15:22 IST2022-05-07T15:19:16+5:302022-05-07T15:22:58+5:30
Optical Illusion : खरंतर या फोटोंमधील प्रश्नाचं उत्तर शोधण्यातही एक मजा असते. पण काही मोजकेच लोक या फोटोंचं गुपित शोधू शकतात.

Optical Illusion: पेंटिंगमध्ये लपले आहेत ६ प्राणी, तुमची नजर तीक्ष्ण असेल तर शोधून दाखवा!
Find Hidden Animals: सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो धुमाकूळ घालत आहेत. हे फोटो दिसतात तसे नसतात. म्हणजे हे फोटो भ्रम निर्माण करतात. लोक काही तास या फोटोवर घालवून त्यातील गुपित शोधण्याचा प्रयत्न करतात. हे फोटो अशा पद्धतीने तयार केले जातात जेणेकरून लोकांना ते संभ्रमात पडावे. खरंतर या फोटोंमधील प्रश्नाचं उत्तर शोधण्यातही एक मजा असते. पण काही मोजकेच लोक या फोटोंचं गुपित शोधू शकतात.
असाच एक फोटो सध्या आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ही एक पेंटिंग आहे ज्यात ६ प्राणी लपले आहेत. पण ते शोधणं इतकंही सोपं नाही. या पेंटिंगमध्ये एक जंगल दिसत आहे. या फोटोतील सहा प्राणी तुम्हाला शोधायचे आहेत. यातून एक तर तुम्हाला मजा येईल आणि तुमचे डोळे अजूनही तीक्ष्ण आहे हेही तुम्हाला कळेल.
अनेक लोक काही मिनिटे या फोटोकडे बघून यातील सहा प्राण्यांना शोधू शकले. तर काहींना तर बराच वेळ काहीच दिसलं नाही. या पेंटिंगमध्ये उंट, फुलपाखरू, मगर, हरिण, कोब्रा आणि ससा लपला आहे. बरेच लोक हे प्राणी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, पण जास्तीत जास्त लोक उत्तर शोधू शकले नाहीत. बरेचजण प्रयत्न करून हार मानत आहेत. ज्यांचे डोळे तीक्ष्ण आणि मन शांत आहे ते लगेच शोधू शकत आहेत.
जर तुम्हाला अनेक प्रयत्न करूनही यातील प्राणी दिसले नसतील तर उत्तर खाली आहे.