Optical Illusion: या फोटोत लपले आहेत एकूण 12 पांडा, 30 सेकंदात शोधण्याचं चॅलेंज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 13:24 IST2022-08-08T13:11:23+5:302022-08-08T13:24:58+5:30
Optical Illusion Find The Panda: पांडाचा एक ऑप्टिकल इल्यूजन असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत 12 पांडा लपले आहेत जे लोकांना दिसत नाहीयेत. बरेच लोक केवळ तीनच पांडा शोधू शकले आहेत.

Optical Illusion: या फोटोत लपले आहेत एकूण 12 पांडा, 30 सेकंदात शोधण्याचं चॅलेंज!
Optical Illusion Find The Panda: पांडा हा असा प्राणी आहे जो आकाराने खूप मोठा असूनही सर्वांनाच आवडतो. पांडाचं वागणं फार क्यूट असतं. ज्या लोकांना बघायला खूप आवडतात. पांडा भारतात दिसत नाहीत. पण अनेकांना त्यांना बघण्याची इच्छा असते. पांडाचे व्हिडीओ पाहताना लोक खूश होतात. अशात पांडाचा एक ऑप्टिकल इल्यूजन असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत 12 पांडा लपले आहेत जे लोकांना दिसत नाहीयेत. बरेच लोक केवळ तीनच पांडा शोधू शकले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो एक पेंटिंग आहे. ज्यात दोन मोठे पांडा आणि एक बेबी पांडा बसलेले दिसत आहेत. पण तुमच्यासाठी चॅलेंज हे आहे की, पेंटिंगमधील बाकीचे पांडा केवळ 30 सेकंदात शोधायचे आहेत. जर असं करण्यात तुम्ही यशस्वी ठरले तर तुम्ही नजर तीक्ष्ण आहे हे तुम्हाला समजेल. या आकर्षक फोटोतील पांडा शोधण्यासाठी तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.
तुम्हाला यातील पांडा शोधायचे असतील तर एक पेन्सिल आणि एक स्केच पेन घ्या. तुमच्या फोनमध्ये 30 सेकंदाचा टायमर लावा आणि शोधायला सुरूवात करा. तुम्ही अशाप्रकारेच पांडा शोधू शकता. पेंटिंग बारकाईने बघा. एकाएका कोपऱ्यावर नजर टाका. झऱ्यापासून ते फुलांपर्यंत, ढगांपासून ते डोंगरापर्यंत तुम्ही पांडा शोधू शकता.