Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 05:35 PM2024-05-12T17:35:05+5:302024-05-12T17:37:31+5:30

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात.

  On the occasion of Mother's Day 2024, businessman Anand Mahindra shared an old photo with his mother and wrote an emotional caption | Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले

Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. ते समाजात घडणाऱ्या आणि सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टींवर नेहमी व्यक्त होत असतात. आता महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी जागतिक मातृ दिनानिमित्त एक खास पोस्ट केली आहे. आज १२ मे रोजी सर्वत्र 'मदर्स डे' साजरा केला जात आहे. या निमित्ताने आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या आईचा ४७ वर्ष जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी एक अतिशय भावनिक पोस्टही शेअर केली आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत आनंद महिंद्रा यांनी मातृ दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी १९७७ मधील एक जुना फोटो शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, १९७७ मधील हा फोटो आहे... मी महाविद्यालयात प्रवेश करण्यापूर्वीचा तो काळ. नेहमीप्रमाणे माझी आई कॅमेराकडे नाही तर दुसरीकडे पाहत होती. यामध्ये ती आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करत आहे. तिचा मुलगा चांगले शिक्षण घेऊन यश मिळवेल, अशी तिला आशा होती. मातृदिनाच्या शुभेच्छा आई... आम्ही तुझी स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहू.

मदर्स डेच्या निमित्ताने आनंद महिंद्रा यांच्या पोस्टने नेटकऱ्यांनी मने जिंकल. आनंद महिंद्रा यांच्या आईला श्रद्धांजली वाहताना युजर्स कमेंटच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. यासोबतच अनेकांनी आनंद महिंद्रांच्या कॉलेज लूकचेही कौतुक केले. एका युजरने लिहिले की, जुने आणि आजचे चित्र यात फारसा बदल झालेला नाही. फक्त तुमचे केस आता पांढरे झाले आहेत. यासोबतच एका युजरने लिहिले की, तुम्ही लहानपणापासूनच स्मार्ट आहात. याचे श्रेय तुमच्या आईलाच जाते.

Web Title:   On the occasion of Mother's Day 2024, businessman Anand Mahindra shared an old photo with his mother and wrote an emotional caption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.