बाबो! अर्धा वाघ, अर्धा सिंह आहे हा प्राणी, १२ फूट लांबी आणि ३१९ किलो आहे वजन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 13:54 IST2019-06-11T13:43:58+5:302019-06-11T13:54:11+5:30
ब्रिडींग करून वेगवेगळ्या प्रजातींचे प्राणी तयार केले जातात. म्हणजे दोन प्राण्यांचे जीन एकत्र करून एका वेगळ्या प्राण्याला जन्म दिला जातो.

बाबो! अर्धा वाघ, अर्धा सिंह आहे हा प्राणी, १२ फूट लांबी आणि ३१९ किलो आहे वजन!
संकरीत करून वेगवेगळ्या प्रजातींच्या प्राण्यांची उत्पत्ती केली जाते. म्हणजे दोन प्राण्यांचे जीन एकत्र करून एका वेगळ्या प्राण्याला जन्म दिला जातो. तसंच वाघ आणि सिंह मिळून जेव्हा एक क्रॉस ब्रीड तयार केलं जातं, तेव्हा त्याला Ligers असं म्हटलं जातं. म्हणजे सिंह आणि वाघ मिळून जन्माला आलेला प्राणी.
हा फोटो 'अपोलो' नावाच्या Ligers चा आहे. हा जगातला सर्वात मोठा Liger असून याचं वजन ३१९ किलो आणि लांबी १२ फूट इतकी आहे.
The Real Tazann नावाच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. Mike Holston आणि Kody Antle हे जनावरांचा अभ्यास करणारे आणि त्यांची काळजी घेणारे दोन व्यक्ती. हे दोघेही अपोलोसोबत व्हिडीओत आहेत. खरंतर इतका मोठा प्राणी बघून आश्चर्याचा धक्काच बसतो.
अपोलो अमेरिकेच्या साऊथ कॅरोलिनामध्ये राहतो. त्याला Myrtle Beach Safari इथे ठेवण्यात आलं आहे. याचा वेग ६४ किमी प्रतितास इतका आहे. अपोलो लोकांना Sabre Tooth ची आठवण करून देत आहे, जे ४२ हजार वर्षांपूर्वी पाहिले आढळत होते.