VIDEO : फणा काढून बसला होता किंग कोब्रा, तरूणाने येऊन केलं त्याला किस आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 11:19 IST2023-11-22T11:18:56+5:302023-11-22T11:19:22+5:30

Kobra Viral Video : असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो बघून लोकं हैराण झाले आहेत.

OMG! Man kisses cobra on head shocking video goes viral | VIDEO : फणा काढून बसला होता किंग कोब्रा, तरूणाने येऊन केलं त्याला किस आणि मग...

VIDEO : फणा काढून बसला होता किंग कोब्रा, तरूणाने येऊन केलं त्याला किस आणि मग...

कोब्रा एक खतरनाक साप आहे. ज्याच्या एका दंशाने व्यक्तीचा जागेवर मृत्यु होऊ शकतो. त्यामुळे हा साप दिसताच लोकांना घाम फुटतो. काही तर नावानेच घाबरतात. पण काही लोक असेही असतात जे अशा सापासोबतही व्हिडीओ बनवतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो बघून लोकं हैराण झाले आहेत.

या व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक किंग कोब्रा फणा काढून बसला आहे. तेव्हा त्याच्याजवळ एक व्यक्ती येतो आणि हळूहळू सापाला डोक्यावर किस करतो. आश्चर्याची बाब म्हणजे ही व्यक्ती लगेच मागे सरकत नाही तर काही वेळ आपले ओठ त्याच्या फण्यावरच ठेवतो.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @snake_lover_narasimha नावाच्या यूजरने पोस्ट केला होता. याच्या कॅप्शनला लिहिलं होतं की, डोळ्यांमध्ये सूड आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 22 लाख व्ह्यूज आणि 1 लाख 63 हजार लाइक्स मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. 

Web Title: OMG! Man kisses cobra on head shocking video goes viral