अरे बाप रे बाप! समुद्रात सापडलेल्या विचित्र जीवाचा व्हायरल व्हिडीओ पाहून उडाली लोकांची झोप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 13:20 IST2020-02-04T13:04:20+5:302020-02-04T13:20:42+5:30
समुद्र हा नेहमीच रहस्यांचा खजिना मानला जातो. कारण यातून वेगवेगळे जीव आणि वेगवेगळ्या गोष्टी समोर येत असतात.

अरे बाप रे बाप! समुद्रात सापडलेल्या विचित्र जीवाचा व्हायरल व्हिडीओ पाहून उडाली लोकांची झोप!
समुद्र हा नेहमीच रहस्यांचा खजिना मानला जातो. कारण यातून वेगवेगळे जीव आणि वेगवेगळ्या गोष्टी समोर येत असतात. सध्या असाच एका समुद्री जीवाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. या व्हिडीओत दिसणारा जीव एका मासे पकडणाऱ्याच्या जाळ्यात अडकला होता. आता त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या जीवाची लोकांना भितीही वाटत आहे.
या विचित्र जीवाला ती पाय असून विचित्र चेहरा आहे. हा जीव कुठे पकडण्यात आला याबाबत माहिती मिळू शकली नाही. पण हा जीव अर्धा ऑक्टोपससारखा वाटतो.
हा व्हिडीओ Nataliia Vorobok नावाच्या यूजरने शेअर केला असून हा कोणता जीव आहे? असा प्रश्न केलाय. त्यावर लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.
दरम्यान याआधीही अशाप्रकारचे वेगवेगळे विचित्र जीव समुद्रात आढळून आले आहेत. पण या जीवाची भिती लोकांच्या मनात अधिक आहे.