OMG!डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानात बिर्याणीची गाडी? फोटो काढण्यासाठी लोकांची झुंबड; पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 16:56 IST2026-01-22T16:48:20+5:302026-01-22T16:56:21+5:30

जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक असलेले डोनाल्ड ट्रम्प चक्क पाकिस्तानच्या रस्त्यावर बिर्याणी विकताना दिसत आहेत!

OMG! Donald Trump's biryani truck in Pakistan? Crowds of people flock to take pictures; Watch the video | OMG!डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानात बिर्याणीची गाडी? फोटो काढण्यासाठी लोकांची झुंबड; पाहा व्हिडिओ

OMG!डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानात बिर्याणीची गाडी? फोटो काढण्यासाठी लोकांची झुंबड; पाहा व्हिडिओ

सोशल मीडिया हे एक असे व्यासपीठ आहे, जिथे कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. सध्या इंटरनेटवर एक असा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे, जो पाहून तुम्हीही क्षणभर थबकाल आणि आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणार नाही. जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक असलेले डोनाल्ड ट्रम्प चक्क पाकिस्तानच्या रस्त्यावर बिर्याणी विकताना दिसत आहेत! होय, तुम्ही बरोबर वाचलंय, पण थांबा... हे खरे ट्रम्प नसून त्यांचे हुबेहूब दिसणारे डुप्लिकेट आहेत.

नेमकं काय आहे व्हिडिओमध्ये?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पारंपरिक पाकिस्तानी बिर्याणीच्या दुकानावर उभी आहे. या व्यक्तीचा चेहरा, केसांची स्टाईल आणि बोलण्याची लकब अगदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जुळणारी आहे. हे पाकिस्तानी ट्रम्प मोठ्या उत्साहात बिर्याणी विकताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव इतके मिळतेजुळते आहेत की, रस्त्यावरून जाणारा प्रत्येक माणूस क्षणभर गोंधळून जात आहे.

सेल्फी घेण्यासाठी लोकांची गर्दी

ट्रम्प यांचा हा डुप्लिकेट पाकिस्तानच्या रस्त्यावर दिसताच लोकांची मोठी गर्दी जमली. लोक केवळ बिर्याणी खाण्यासाठीच नाही, तर या ड्युप्लिकेट ट्रम्पसोबत सेल्फी घेण्यासाठी अक्षरशः गर्दी करत आहेत. हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम आणि एक्सवर प्रचंड शेअर केला जात असून 'umashankarsingh' नावाच्या युजरने तो शेअर केला आहे.

नेटिझन्सच्या मजेशीर कमेंट्स

हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युजरने गमतीने विचारले, "ट्रम्प साहेब, अशी काय मजबूरी आली की तुम्हाला बिर्याणी विकावी लागतेय?" तर दुसऱ्याने लिहिले, "शेवटी पाकिस्तानला स्वतःचा ट्रम्प मिळालाच!" अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर करत या व्हिडिओचा आनंद घेतला आहे.

हुबेहूब दिसण्याचा करिश्मा

जगभरात अनेकदा प्रसिद्ध नेत्यांचे डुप्लिकेट्स समोर येत असतात, पण या बिर्याणी विक्रेत्याचे साम्य इतके जास्त आहे की लोक त्याला पाहून थक्क झाले आहेत. पांढरा शर्ट आणि ट्रम्प यांच्यासारखी सिग्नेचर हेअरस्टाईल यामुळे हा व्हिडिओ आता जागतिक स्तरावरही चर्चेचा विषय ठरला आहे.

Web Title : ओएमजी! डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तान में बिरयानी बेचते दिखे: वीडियो वायरल।

Web Summary : पाकिस्तान में डोनाल्ड ट्रम्प के हमशकल को बिरयानी बेचते हुए देखकर एक वीडियो वायरल हो गया है। लोग उनके साथ सेल्फी लेने के लिए इकट्ठा हो रहे हैं, जो कि अद्भुत समानता से मनोरंजन कर रहे हैं। नेटिज़न्स ने हास्यपूर्ण प्रतिक्रियाओं के साथ टिप्पणियों की बाढ़ ला दी है।

Web Title : OMG! Donald Trump spotted selling biryani in Pakistan: Viral video.

Web Summary : A video of a Donald Trump look-alike selling biryani in Pakistan has gone viral. People are gathering to take selfies with him, amused by the uncanny resemblance. Netizens have flooded the comments section with humorous reactions.