आज्जींनी धरला 'सामी सामी' गाण्यावर ठेका, लोक म्हणाले आज्जींच्या अंगात मायकल जॅक्सन शिरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 15:45 IST2022-05-03T15:40:44+5:302022-05-03T15:45:10+5:30

एका तरुण आज्जींचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या आजींचा उत्साह बघुन तुम्ही तोंडात बोटं घालाल. 

old woman dancing on pushpa song sami sami video goes viral on social media | आज्जींनी धरला 'सामी सामी' गाण्यावर ठेका, लोक म्हणाले आज्जींच्या अंगात मायकल जॅक्सन शिरला

आज्जींनी धरला 'सामी सामी' गाण्यावर ठेका, लोक म्हणाले आज्जींच्या अंगात मायकल जॅक्सन शिरला

एज इज जस्ट ह नंबर अशी इंग्रजी म्हण आहे. याचाच अर्थ कोणत्याही वयात माणसात उत्साह असेल तर तो तरुणच असतो. अशा तरुण आज्जींचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या आजींचा उत्साह बघुन तुम्ही तोंडात बोटं घालाल. 

पुष्पा या चित्रपटाची जादू आजही प्रेक्षकांवर आहे. या चित्रपटातील गाण्यांचे रिल्स अनेक तरुण- तरुणी, सेलिब्रिटी करत असतात. मात्र आता जो आज्जींचा पुष्पाच्या गाण्यावर नाचतानाच व्हिडिओ आहे असा व्हिडिओ तुम्ही कधीही पाहिला नसेल. यात या आज्जींच्या अंगात मायकल जॅक्सन शिरलाय की काय असा प्रश्न तुम्हाला पडेल.

आज्जींचा हा डान्स अत्यंत भन्नाट आहे. त्यांच्या मुव्ह्सही अत्यंत मजेशीर आहेत. अनेकजण यावर मजेशीर कमेंट्सही करत आहेत.

Web Title: old woman dancing on pushpa song sami sami video goes viral on social media